चाळीस हजार रुपयांसाठी सहा तास मृतदेह अडकवून ठेवणाऱ्या हकिमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची शिवसेना (उ.बा.ठा) ने तोडफोड करण्याचा इशारा देत मृतदेह दिला नातेवाईंकाचे ताब्यात

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
मलकापुर:- शहरातील भारत कला रोडवरील हकिमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून ऑपरेशन होऊन मरण पावलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना चाळीस हजार रुपयांची मागणी करत मृतदेह तब्बल सहा तास अडकून ठेवला याबाबतची माहिती रुग्णांच्या नातेवाइकांनी शिवसेना (उ.बा.ठा) शहरप्रमुख गजानन ठोसर, नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ यांना देताच त्यांनी हाॅस्पिटल मध्ये येत मृतदेह पैश्यांसाठी अडवून ठेवल्याचा जाब विचारत हॉस्पिटल तोडफोड चा इशारा देत मृतदेह उचलून नातेवाईकांच्या ताब्यात  दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्राम शिराढोण येथील कमलबाई यादव इंगळे वय 68 ह्या घरात पाय घसरून पडल्याने त्यांचा डावा हात व पाय शनिवार दि. 05 एप्रिल रोजी फ्रॅक्चर होऊन त्या जखमी झाल्या त्यांना मलकापूर येथील हकिमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून दि.07 एप्रिल रोजी रात्री आठ ते दहा वाजे दरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू असतांना आज दि.09 एप्रिल रोजी सकाळी चार वाजे दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे  हॉस्पिटल मध्येच दुःखद निधन झाले रुग्णालय प्रशासनाने चाळीस हजार रुपये बिल बाकी असल्याचे सांगत त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला विनवणी करूनही मृतदेह ताब्यात देत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक यांनी सदर घटनेची माहिती शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर, नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ यांना सांगितली हॉस्पिटलमध्ये तात्काळ धाव घेत मृतदेह अडकवून ठेवण्याचा जाब विचारत हॉस्पिटलची तोडफोड करण्याचा इशारा देताच हकिमी हॉस्पिटल प्रशासन नरमले,ॲड हरीश रावळ,गजानन ठोसर यांनी मृतदेह उचलून मुलगा योगेश यादव इंगळे, गणेश मारुती इंगळे, अनंत रामचंद्र नारखेडे, सचिन शंकर नारखेडे, प्रदीप पुंजाजी वराडे ,अजय नामदेव नारखेडे, प्रल्हाद तुकाराम बऱ्हाटे या नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

      योजनेचा फायदा जनसामान्यांसाठी की हाॅस्पिटलसाठी.... हरीश रावळ
 
महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेतून ऑपरेशन होऊन तुमचे ॲप्रुयल (मान्यता)आली नाही असे म्हणून गोरगरिबांची आर्थिक लुबाडणूक करून रुग्ण दगावल्यावरही तब्बल सहा तास मृतदेह ताब्यात देत नाही, संबंधित डॉक्टरांना माणूसकी शून्य झाली असून योजनेत आर्थिक लोभापायी लोकांची लुबाडणूक करणाऱ्या डॉक्टरांविषयी आमच्याकडे तक्रार करा आम्ही त्यांना योग्य रीतीने धडा शिकवण्याचा इशाराही यावेळी हरीश रावळ, गजानन ठोसर यांनी दिला.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)