महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना सदर संघटनेच्या गृपला संलग्नीत असना्रया माझ्या प्रिय स्नेही बांधवांनो.महाराष्टामधे चालत असलेल्या राजकीय परिस्थिती मूळ या ठिकाणचा सर्व सामान्य व्यक्ती फार गु़तागुती च्या समस्यांच्या विळख्यात पडलेला आहे,
By -
अप्रैल 09, 2025
0
त्यामुळे प्रत्येक माणसाच्या समोर अनेक प्रश्न उपस्थित आहेत याकरिता सर्व सामान्य माणूस चिंतेत आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या समस्या सोडून द्याव्यात याकरता नको तो विचार त्यांच्यासमोर उभा आहे. यामध्ये महाराष्ट्राती शासन पद्धती देखील तेवढी जबाबदार आहे. करिता महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेने सुशासन सुशासन संदर्भात पाऊल उचललेले आहे. सुशासन प्रशासन असेल तर माणसांच्या समस्या गाव पातळीवर वेळेवर सोडविल्या जातील आणि सर्वसामान्यांना वेळेची बचत होऊन सर्व सामान्य माणसाला योग्य दिशा मिळेल मला करिता सुशासन हेच उत्तम प्रशासन असे ल म्हणून महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे पदाधिकारी सर्व सामान्य जनतेच्या समस्या गाव पातळीवर सोडवण्याकरिता शासनाने मदत करावी म्हणून सतत पाऊल उचलत आहे. याकरिता गावातील मुख्य गावचे केंद्रबिंदू म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय. ग्रामपंचायत मार्फत गावाचा विकास आणि सर्वसामान्य जनतेच्या विकासाला चालना देणारे एक केंद्रबिंदू म्हणून समजले जाते याकरिता शहरी ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालय सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू ठेवून पूर्णच कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपस्थित असणे शासन नियमानुसार अनिवार्य आहे. असे असून देखील बहुतांश कर्मचारी गैरहजर राहून ग्रामपंचायत कार्यालय बंद अवस्थेत असतात असे संघटनेच्या निदर्शनास आलेली बाबी गंभीर्यपूर्ण आहे हे समजून महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना मागील एक वर्षापासून सुशासन संदर्भात शासनाकडे मागणी करत आहे आणि त्यानिमित्ताने अभियान राबवत आहे. तरी सदर ग्रुप ला संलग मित्र असणाऱ्या माझ्या प्रिय बांधवांना विनंती आहे की आपल्या गावचे ग्रामपंचायत बंद अवस्थेत राहत असेल कर्मचारी उपस्थित राहत नसतील तर सदर ग्रुप ला आपल्या गावच्या ग्रामपंचायतीचा बंद अवस्थेत असलेला फोटो सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत केव्हाही टाकने. किंवा खालील दिलेल्या फोन नंबर वर ग्रामपंचायत बंद असलेला फोटो टाकून गावचे नाव आणि स्वतःचे नाव टाकून आपल्या गावचे ग्रामपंचायत चालू ठेवण्या सहकार्य करावे आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या गावकरी व सोडून घेण्यास समर्थ राहाल हीच अपेक्षा. श्री दिलीप भैय्या गायकवाड, संघटना प्रमुख फोन नंबर 9767382129
