कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात सिग्मा इलेक्ट्रिकल कंपनीचा ओपन कॅम्पस ड्राईव्ह ११ एप्रिलला

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मलकापूर   पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे सिग्मा इलेक्ट्रिकल प्रा. लि. चाकण पुणे यांच्या वतीने ओपन कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. ही संधी बीई व डिप्लोमा अंतिम वर्ष २०२५ बॅचसाठी असून मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रॉडक्शन, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.

ही भरती प्रक्रिया ११ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सुरु होणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी दोन हार्डकॉपी स्वरूपातील बायोडाटा आणि पासपोर्ट साईझ फोटो बरोबर आणावेत. कंपनीत निवड झालेल्या उमेदवारांना दोन वर्षांचा ऑन-रोल प्रशिक्षण कालावधी राहील.

प्रथम वर्षासाठी वार्षिक पॅकेज ₹२,३१,७६७/- व दुसऱ्या वर्षासाठी ₹२,४३,७५८/- इतके असून मोफत बस सेवा, सबसिडाइज्ड कँटीन, युनिफॉर्म, सेफ्टी शूज, ग्रुप मेडिक्लेम, वेलनेस व ई ए पी प्रोग्राम्स यांसारख्या विविध सुविधा देण्यात येणार आहेत.

निवड प्रक्रिया ऑनलाईन लेखी चाचणी, तांत्रिक मुलाखत व एचआर मुलाखतीच्या माध्यमातून होईल. नोंदणीसाठी https://surl.li/bivnqw या लिंक चा वापर करावा तसेच अधिक माहितीसाठी प्रा. एस. आर. शेकोकार मो.९०११५७९८१८, प्रा. आर. एम. चौधरी मो.९७६६११८९४०, प्रा. पी. व्ही. चोपडे मो. ९०११५७९६१५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे व प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी केले आहे

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)