बुलढाणा मोताळा
दिनाक 5/5/2025 महामार्ग सडक व रस्ते यांच्या कडेला असलेले जागेत शासनाकडून दरवर्षी विविध योजनेच्या माध्यमातून लाखो झाडे लावली जातात रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ऊंन वारा पाऊस वाटसरूचे रक्षण करतात अनेक राहगिर उन्हापासून उन्हाळ्यात झाडाखाली सावलीत विसावा घेता झाडे व वृक्षापासून आपल्याला फळ फुले लाकडे इंधन स्वरूपात व अनेक औषधोपचारासाठी झाडाची साली व कंदमुळे वापरले जातात
व जमिनीचे धूप उन्हाचे आद्रता तापमानातील बदल पावसाचे प्रमाण सुद्धा झाडे दाट जंगली वने यांच्यावर अवलंबून असते पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात
त्यामुळे शासनाने अनेक जंगले वने व झाडांना संग्रहित केले आहे
त्यांच्या संरक्षणासाठी विविध उपाय योजना राबवली जाते महात्मा गांधी रोजगार हमीच्या माध्यमातून सामाजिक वनीकरण
यांच्या मार्फत रोपवणे तसेच झाडांना जगण्यासाठी व त्यांचे पाळीव इतर जनावरांपासून संरक्षणासाठी व उन्हाळ्यात झाडांना पाणी मिळावे म्हणून शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरून मनुष्यबळ मजूर उपलब्ध करून देण्यात येते
व त्यासाठी प्रत्येकी माणसाला 285 रुपये मजुरी म्हणून दिली जाते
कारण झाडे व वृक्ष जगवने ही काळाची गरज आहे
झाडे लावा झाडे जगवा या स्लोगनाच्या माध्यमातून तसेच तसेच विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षाचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्यात येते
मात्र अलीकडच्या काळात मनुष्य स्वतःच्या स्वार्थासाठी
काही शेतकरी आपल्या बांधावरील तसेच सडक व रस्त्याच्या कडेला लावलेली. दूतर्फा झाडे मोठ्या प्रमाणात अवैद्य रीता तोडत आहे
त्यासाठी नवीन शक्कल युक्ती लढवली जात आहे शेतातील काळी कचरा बांधावर टाकून अनेक वर्ष जुनी असलेले झाडे जाळली जात आहे
काही ठिकाणी तर 30 40 वर्षे जुनी असलेली विशाल काय झाडाच्या मुळाजवळ कचरा टाकून निर्जीव करून जाळले जात आहे व अनेक प्रकारची रोपे आगीमुळे होरपडून कुमजत आहे
त्याचे मानवास अनेक दुष्परिणाम भोगावे लागत आहे
झाडे व वनाचे मोठ्या प्रमाणात होत असलेले तोड यामुळे पर्यावरणातील ऋतुचक्र बिघडलेले त्यामुळे वर्षानुवर्ष कमी होत चाललेल्या पावसाचे प्रमाण व तापमान होत असलेली वाढ कारणीभूत आहे
सदर विषयाकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे संबंधित शेतकऱ्यांना तसेच लाकूड माफियांच्या विरोधात कठोर दंडात्मक कारवाईची करावी
अन्यथा याचा गंभीर परिणाम आपण सर्वास भविष्यात भोगावे लागणार आहे
