शिवसेना (उ.बा.ठा) च्या आंदोलनाच्या इशाऱ्याने पारपेठ राममंदिर परिसरात 200 के.व्हि चा ट्राॅन्स्फार्मर बसवून डि.पी वरील लोड ची केली विभागणी

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मलकापुर:- पारपेठ भागातील राममंदिर परीसरात 63 के.व्हि कमी दाबाची डि.पी (ट्रान्सफॉर्मर) असल्याने त्या डि.पी वरील ताज नगर, फकीरपुरा, धनगरपुरा, श्रीराम मंदिर वार्ड या भागातील रहिवासी घरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असल्याने रहिवासी नागरिकांनी शिवसेना (उ.बा.ठा) शहरप्रमुख गजानन ठोसर यांना याबाबत अवगत केले असता रहिवासी नागरिकांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता राजेश मिश्रा यांना  निवेदन देत आठ दिवसांत 200 के.व्ही चा ट्राॅन्सफार्मर बसवा अन्यथा कंपनी कार्यालयाची लाईट कट करण्याचा ईशारा गजानन ठोसर यांनी दिला होता.शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या धास्तीने कार्यकारी अभियंता राजेश मिश्रा,आर.जि.तायडे, अभियंता महाजन, योगेश भालेराव यांनी सातव्याच दिवशी दि.23 एप्रिल 25 रोजी राममंदिर परीसरात 200 के.व्हि चा ट्राॅन्सफार्मर बसविण्यात आला होता. या ट्रान्सफॉर्मर चा लोड विभाजन दि.21 मे बुधवार रोजी करण्यात आला यावेळी शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, सत्तार शहा, अय्युब खा जमादार,आरीफुर रहेमान,सै.कदीर,शे.शब्बीर,शे.युसुफ डि. आय.एफ.ए.खान, सै.शकील सै.खलील, सै.फिरोज सै.अरहम, राधेश्याम वैष्णव, गुलाब खान, ए.के.खान, सलीम खान, मो.आरीफ, फिरोज खान, शेख कलीम, मुजफ्फर खान, नसमूल हसन, हसन खान, अतीक अहेमद, शेख बिसमिल्ला, शेख करीम,अब्दुल रशीद, शेख जुबेर, सै.निसार, अशहर खान, जमील खान, सै.युनुस, मो.नदीम, फिरोज खान फिरोज,शे.मुजम्मील, जमील खान, शे.सोनू, शे.जुबेर, करीम खान, सै.नुरोद्दीन, हसन खान,गुड्डू भाई चक्की वाले, सै.राशीद, सै.मुदस्सीर, वसीम अंसारी, इमरान घातक, शेख फरहान, बब्लु भाई, माजीद भाई, आबीद भाई, आकीब खान, यांचेसह या भागातील रहिवासी नागरिकांची उपस्थिती होती.या भागात गेल्या दहा-बारा वर्षांपासून ( डि.पी ) लाईटच्या या समस्येपासून सुटकारा मिळाल्याने रहिवासी नागरिकांनी शिवसेना (उ.बा.ठा) पदाधिकाऱ्यांचे आभार मानले!

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)