भारतरत्न श्री राजीवजी गांधी यांची पुण्यतिथि, ऑपरेशन सिंदूरचा उत्सव अश्या संयुक्त विषय घेत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे निर्देश अनुसार आज बुधवार दिनांक 21 में रोजी शहर तथा तालुका कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना (उबाठा) मलकापुर चे संयुक्त विद्यमाने मा आ श्री राजेशजी एकडे, डॉ अरविंदजी कोलते, हाजी रशीदखॉजी जमादार, श्यामभाऊ राठीजी, एड साहेबरावजी मोरे ॲड हरीशजी रावळ, संतोषभाऊ रायपुरेजी सह सर्व सम्माननीय जेष्ठ नेते मंडळीचे अनमोल मार्गदर्शनात श्री हुतात्मा स्मारक ते शहीद श्री संजयसिंह राजपूत स्मारक पर्यंत तिरंगा रैलीचे आयोजन करण्यात आले होते*
*सुरुवातीला माजी सैनिकांचे फेटे व पुष्प देऊन सन्मान करण्यात आले नंतर माजी सैनिक संगठनेचे अध्यक्ष यांचे शुभहस्ते हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र चढवून मानवंदना देन्यात आली त्यानंतर रैली मध्ये सर्वात समोर बैंड वर देशभक्तिचे गीत वाजवत त्यामागे राष्ट्रीय ध्वज, सम्माननीय माजी सैनिकांचे सजवलेले रथ, पूर्ण गणवेशातील हातात राष्ट्रीय ध्वज घेतलेले माजी सैनिक, दोन दोनचे रांगेतिल गांधी टोपी परिधान केलेले व हातात राष्ट्रीय ध्वज घेंऊन असलेल शिश्तबद्ध पुरुष, माताभगिनी त्या पाठोपाठ भूतपूर्व पंतप्रधान भारतरत्न स्व श्री राजीवजी गांधी यांचे तौलचित्र सजविलेलेले रथ, भारतमाता सह वीर रणांगना भगिनीद्वय कर्नल सोफिया कुरैशी तथा विंग कमांडर व्योमीका सिंग यांचे फोटो असलेल तैलचित्र सजविलेले रथ अश्या उत्स्फूर्त वतावरणात रैली शहिद स्मारकवर पोहोचल्या नंतर वीरपत्नी तथा महिलांच्या हस्ते शहीद श्री संजयसिंह राजपूत यांचे समाधिला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले त्यानंतर माताभगिनीचे शुभहस्ते वीरपत्नीचे साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आलेनंतर पहलगाम येथे क्रूर अतिरेकी हल्यात मरन पावलेल्या भारतीय नागरिक तथा ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेले वीर जवान या सर्वांना दोन मिनिटांचा मौन ठेवत श्रद्धांजलि अर्पण करण्यात येऊन राष्ट्गीत गायन करण्यात आले नंतर स्व श्री राजीवजी गांधी यांना श्रद्धांजलि देन्यात येऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला*
*विशेश - पांढरे वस्त्र, गांधी टोपी परिधान करूंन हातात तिरंगा घेतलेले दोन दोन च्या रांगेत शिष्टबद्ध चालत भारत माता की जय, वंदे मातरम, हम सब एक है, वीर जवान अमर रहे, हिन्दू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई, राजीव गांधी अमर रहे इत्यादि गगनभेदी घोषणा देत चालत असलेली रैली सर्वांचे लक्ष्य आकर्षित करत होती व रस्त्यात अनेक ठिकानी नागरिकांच्या वतीनं स्वयंस्फूर्तपने माजी सैनिक तथा रैली मद्दे सम्मिलित लोकांवर पुष्पवृष्टि कारण्यत आली...*
*मलकापुर तालुका आजी माजी सैनिक संघनेटचे अध्यक्ष श्री गोकुलसिंह परमार, उपाध्यक्ष श्री गोपाल दवंगें यांचे सह शहर व तालुक्यातील सर्व सम्माननीय आजी माजी सैनिक बांधव उपस्थितांचं लक्ष्य वेधुन घेत होते*
