शिवसेना (उ.बा.ठा) जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी वाहतूक पोलीस पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्यानं उडाली एकच खळबळ..
मलकापुर:- जिल्हा वाहतूक शाखेचे बुलढाणा येथील पोलीस पारखेड फाटा ते जयपूर लांडे फाट्यादरम्यान शेळके नामक वाहतूक पोलीस जे नेहमीच याच वसुलीवर असतात व त्यांचे दोन सहकारी पोलीस कर्मचारी दुपारी दिड वाजता भर ऊन्हात पुन्हा एकदा श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या गाड्यांना थांबवून परेशान करुन ( कधी लायसन्स नसते ,कधी PUC नसते असली तर मुदत संपलेली असते तर कधी क्षमतेपेक्षा एखादे सिट जास्त तर कधी बेल्ट लावलेला नसतो तर बरेचवेळा ड्रायव्हर नसतो म्हणून गाडी स्वतः मालक चालवतो ) कुठेना कुठे सापडतेच
गाडीमध्ये घरच्या किंवा नातेवाईक महीला असतात त्याचे समोर अपमान होऊ नये म्हणून जे काही मागितले ते कमी जास्त करुन गाडीवाला मोकळा होतो
हे पथक ट्रकला कधीच थांबवत नाही व ट्रक थांबत बी नाहीत
या अगोदर याच ठिकाणी खामगाव चा एक पोलीस स्वतः च्या गाडीने ट्रकचा पाठलाग करताना चा व्हिडिओ व्हायरल झाला होता तरीही या ठिकाणी भक्तांकडून भरपूर पैसे मिळतात म्हणून हे ठिकाण च निवडलेले आहे .
18 मे चे अगोदर डुकरे व त्यांचे 5 सहकारी जयपूर लांडे स्पाॅटवर हे च महान कार्य करत होते.
गैरकानुनी भरपूर वाहतूक होते त्यामधे रेती, मुरुम,गिट्टी,
अमानुष वाहतूक करणाऱ्या गुरांच्या गाड्या आहेत, ओव्हर लोड ट्रक आहेत , कर्कश आवाज हार्न , नियमबाह्य हेडलाईट , बिगर नंबर च्या गाड्या वगैरे पण हे सर्व सोडून श्री संत गजानन महाराजांचे भक्तांचे मागे लागतात कारण पैसे भरपूर मिळतात वास्तविक यांच्या डिवट्या जेथे ट्राफिक असते त्या गर्दीचे ठिकाणी असते परंतु वरिष्ठांना खूश करुन हे हायवे वर येतात असाच प्रकार या ठिकाणी व्हिडिओत टिपला शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी आणि तो व्हिडिओ सोशल मिडियावर आता जोरात व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये वाहतूक पोलीस गाडीतून गाडी चालकाला सोबत घेऊन विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या पोलीस गाडीत बसून त्याचे जवळून पैसे घेऊन त्यास सोडून देत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याने पोलीस प्रशासनाची नाचक्की होत असल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष देऊन लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे? तसे पाहिले तर हे सर्व चेक करण्यासाठी RTO आहेत पण ते तसं नाही च
ईकडे प्रत्येक ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे पण ठाणेदार म्हणतात आमच्या कडे स्टाफ नाही व हे एका एका ठिकाणी पाच -पाच,सात- सात पोलीस रोडवर असतात
जिल्हा पोलिस अधीक्षक यांना विनंती आहे की श्री संत गजानन महाराजांचे दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना त्रास देऊ नये व वर्षानुवर्षे ट्राफिक मधे ठाण मांडून बसलेल्यांना चौकशी करण्यात यावी अशी मागणी भक्त गण करीत आहे.
