मलकापुर:- नगरपालिका हद्दीतील हनुमान नगर मधील नाला नगरपालिकेने त्वरीत बांधावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा आज शिवसेना (उ.बा.ठा) व प्रहार संघटनेच्या वतीने न.प मुख्य प्रशासक तथा तहसिलदार राहुल तायडे यांना निवेदनाद्वारे दिला आहे .
निवेदनात नमूद केले आहे की आम्ही सर्व न प हद्दीतील हनुमान नगर मधील रहिवासी असून हनुमान नगर मधील डांबरी रोड पर्यंत मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत ने त्यांचे हद्दीतील नाल्यांचे संपूर्णपणे बांधकाम केले असून त्याचे सांडपाणी नगरपालिका हद्दीत सोडले आहे आता नगरपालिका नव्याने बस स्थानकाच्या पाठीमागून मोठी नालीचे बांधकाम करत असून त्याचे पाणी याच नाल्यात सोडणार आहे हे सर्व पाणी आम्हा रहिवासी नागरिकांच्या घरात घुसून या पाण्यामुळे रोगराई पसरत असून या नाल्यातून जमिनीवरती सरपटणारे साप, विंचू आदीं निघत असून यांच्यामुळे आमच्या रहिवासी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून आपण त्वरित नाल्याचे बांधकाम करावे अन्यथा नगरपालिका व मलकापूर ग्रामीण मधून होणाऱ्या नाल्याचा पाण्याचा निचरा बंद करण्यात येईल व न.प त सर्पछोडो आंदोलन करणाऱ्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास, प्रहार संघटनेचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, यांनी दिला आहे.निवेदनावर माजी सैनिक ज्ञानदेव इंगळे, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी,अविनाश सावळे,मयूर फाटे, अरुण चौधरी, सागर चौधरी, वासुदेव खर्चे,रमेश कवळे, निलेश कोल्हे,बळीराम भंवर, लिलाबाई चिकटे, शिलाबाई चिकटे, प्रल्हाद सावळे, उमेश तळोले, पांडुरंग इंगळे, श्याम साठे, गणेश खर्चे, गणेश करांडे, गजानन चव्हाण,हरीदास महाकाळे, श्रीराम देवकर, प्रशांत खराटे, रमेश कांडेलकर, राम भैय्या, शिवम कोल्हे, नंदू इंगळे, सुनील गोस्वामी सह आदिंच्या सह्या नमूद आहे.निवेदनाच्या प्रती मुख्याधिकारी न.प मलकापुर,गटविकास अधिकारी पं.स मलकापुर, ग्रामसेवक,प्रशासक मलकापुर ग्रामीण,पो.नि शहर पोलिस स्टेशन यांना दिल्या आहेत.
