मलकापूर उपजिल्हा रुग्णाल्यात अपंग जनता दल सामाजिक संघटना तर्फे असमर्थ व बहु दिव्यांगयांचे व प्रमाणपत्र मीळने साठी तपासणी शिबीर संपन्न

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मलकापुर:- अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या प्रयत्नाने आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड हरीश रावळ माजी नगराध्यक्ष न.प. मलकापूर,तर  प्रमुख उपस्थिती नायब तहसिलदार श्रीकृष्ण उगले ,शहर पो.नि गणेश गिरी,मलकापूर ग्रामीण पो.नि संदिप काळे,डॉ. राजेश उंबरकर वैद्यकिय अधिक्षक वर्ग-१ उपजिल्हा रूग्णालय मलकापूर, ज्येष्ठ पत्रकार हरीभाऊ गोसावी, शिवसेना( उ.बा.ठा) शहरप्रमुख गजानन ठोसर, कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास, पत्रकार अजय टप उपजिल्हा प्रमुख प्रहार संघटना,सचिन भंसाली सह आदिंची उपस्थिती होती. अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या सततच्या पाठपुराव्याने गेल्या दोन वर्षापासून उपजिल्हा रुग्णालय मलकापुर येथे नियमितपणे प्रत्येक बुधवारी अस्थिव्यंग, नेत्र तपासणी शिबिर होतात व महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी मतिमंद /मनोरुग्ण संबधीत तज्ञ डॉ.हजर असतात. तसेच आपल्या मलकापूर येथील दिव्यांग बोर्डात फिजीशीयन तज्ञ उपलब्ध नसल्यामुळे पोलीओ/पॅरालेसीस (लकवा) या आजारांचे रूग्णांना खामगांव आणि बुलढाणा येथे जावे लागते. मलकापूरात अनेक दिव्यांगांना बुलढाणा/खामगांव जाणे-येणे शक्य होत नाही. या कारणात्सव बरेचसे दिव्यांग प्रमाणपत्रापासुन वंचीत हेते. अशा असमर्थ व बहु दिव्यागांचा संघटनेचे राज्य सचिव कलीम शेख  व त्यांचे सहकारी दिव्यांग मित्र यांनी प्रमाणपत्रा पासून वंचीत दिव्यागांचा शोध घेवून त्यांच्यासाठी राहत्या घरुन जाण्या - येण्यासाठी ची व्यवस्था करुन अश्या दिव्यंगाची 
 संबधीत तज्ञ उपलब्ध करून दिव्यांग प्रमाणपत्र मिळणेकरीता विशेष तपासणी शिबीराचे आज दि.20 मे रोजी आयोजन केले होते.यात नेत्र तज्ञ डॉ निरज क्षिरसागर उपजिल्हा रुग्णालय मलकापुर,अस्थीव्यंग तज्ञ डॉ सिंधीकर सामान्य रुग्णालय खामगाव, डॉ वैभव राणे फिजीशिन, मानसोपचार तज्ञ 
 डॉ विश्वास खर्चे वर्ग-१ जिल्हा रुग्णाल बुलडाणा,रबडे किलनीकल सायकॉलॉजिस्ट, अध्ययन अक्षम निदान व प्रमाणिकरण केंद्र जिल्हा रुग्णालय बुलडाणा यांनी तपासणी केली.या  शिबिरात एकूण 40 असर्मथ व बहूदिव्यंगाची तपासणी करण्यात आली.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)