शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी महायुती सरकारविरुद्ध न्यायालयात दाद मागणार ॲड साहेबराव मोरे

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मलकापुर महायुती शासनाने सत्तेत येण्याकरीता शेतकर्‍यांना कर्जाच्या माफीचे गाजर दाखविले व सत्तेत बसताच आपला शब्द फिरवून शेतकर्‍यांचा विश्वासघात केला. अशा या दळभद्री महायुती विरूध्द शेतकर्‍यांच्या माध्यमातून शेतकरी नेते तथा किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशभाऊ पोहरे यांनी लोकलढा, लोक चळवळ उभारली आहे. या महायुती सरकारविरूध्द न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड.साहेबराव मोरे यांनी सांगितले.
शेतकरी नेते, दै.देशोन्नतीचे एडीटर इन चिफ, लोकनायक, किसान ब्रिगेडचे (राष्ट्रीय) संस्थापक अध्यक्ष प्रकाशभाऊ पोहरे यांच्या संकल्पनेतून व शेतकर्‍यांनी दिलेल्या समर्थ साथीतून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा लोकलढा सुरू करण्यात आला आहे. त्याच माध्यमातून किसान ब्रिगेडच्या (राष्ट्रीय) वतीने पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात लाखो शेतकर्‍यांनी किसान कर्ज मुक्तीचा पहिला टप्पा  १४ मे रोजी पार पाडला. तर दुसर्‍या टप्प्यामध्ये पुन्हा किसान कर्ज मुक्तीचे अर्ज घेण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. त्याअनुषंगाने आज २६ मे रोजी या दुसर्‍या टप्प्याचा किसान कर्ज मुक्तीचे अर्ज भरण्याच्या अनुषंगाने स्थानिक श्री मराठा मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अ‍ॅड.साहेबराव मोरे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ, राजेंद्र पाटील, विलासराव शेळके,  शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर, सोपानराव शेलकर, सुरेशचंद्र पाटील, ज्ञा.ना.हिवाळे सर, शेषराव पाटील, किसान सेना शहरप्रमुख हरीदास गणबास, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, किसान सेना शहरप्रमुख सै.वसीम सै.रहीम यांचेसह आदींची उपस्थिती होती. यावेळी अ‍ॅड.रावळ यांनी शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात उभारलेली लोक चळवळ ही शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याकरीता असून यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवून महायुती शासनाच्या विरूध्द पाठीशी उभे रहावे, असे सांगितले. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी श्री मराठा मंगल कार्यालयात मलकापूर, मोताळा, नांदुरा तालुक्यातील बहुसंख्य शेतकर्‍यांसह महिलांचीही उपस्थिती लाभली. त्यानंतर शेतकर्‍यांनी किसान कर्ज मुक्तीचे अर्ज भरून दिले. यानंतर तहसीलदार मलकापूर यांच्याकडे उपस्थित मान्यवर व बहुसंख्य शेतकर्‍यानी किसान कर्ज मुक्तीचे अर्ज सादर केले.  या किसान कर्ज मुक्तीच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये बहुसंख्य शेतकर्‍यांनी गेल्या १० दिवसापासून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)