आज दिनांक 23 जून 2025 रोजी न प उर्दू प्राथमिक शाळा क्रं 2 पारपेठ मलकापूर येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला .यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना विशेष म्हणजे वर्ग १ली मध्ये दाखल विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना गणवेश , जूते पायमोजे व पुस्तक, फुले माननीय हाजी रशीद खा जमादार माजी नगराध्यक्ष मलकापूर व माननीय उपमुख्याधिकारी साहेब श्री विठ्ठल भुसारी साहेब व मा.प्रशासन अधिकारी साहेब तथा मुख्याध्यापक सैय्यद असगर अरशी सर व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांचे हस्ते मुलांना देण्यात आले. तसेच शाळेत सुंदर रित्या सजावट करण्यात आली व आटोरिक्षा सजावट करुन विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली अतीशय सुंदर वातावरणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका, शाळा समिती सदस्य व पालक वर्ग व अल्हाज डॉ. सैय्यद अज़हर महेमूद साहेब उपस्थित होते शेवटी विद्यार्थ्यांना पोषण आहार सोबत ड्राय फ्रूट मिक्स ज़रदा (गोड डिश ) देण्यात आले तदनंतर मुख्याध्यापक तथा प्रशासन अधिकारी श्री सैय्यद असगर अरशी सर यांनी मान्यवरांचे आभार मानले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मो. जाकीर सर यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मो. जुबेर मो. उस्मान नुर सर , मो. ईलयास सर , मो. युनुस सर, मो. कमर सर तथा समीना बाजी, फरहत बाजी , अतीया बाजी , नगमा बाजी, अफिफा बाजी सर्व शिक्षिकांनी परिश्रम घेतले
