बारावीचा निकाल मलकापूर तालुक्यातून उर्दू माध्यमातून उर्दू गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालय प्रथम क्रमांक पटकावला

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मलकापुर (प्रतिनिधि)
मोहनपूरा येथील उर्दू गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता बारावीचा निकाल आज सोमवारी, ५ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मलकापूर तालुक्यातील उर्दू माध्यमाच्या कनिष्ठ महाविद्यालयातून उर्दू गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालयचा प्रथम क्रमांक पटकावला आहे.
     फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात  आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात मलकापूर तालुक्यातून उत्तम निकालाची  परंपरा यंदाही कायम राखली बारावी परीक्षेदरम्यान  कॉपी मुक्त अभियानाची  कडक अमल बजावणी करण्यात आली. उर्दू गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालयचा निकाल ९५. ९४ टक्के लागला असून मलकापूर तालुक्यातील उर्दू माध्यम  प्रथम क्रमांकावर  आहे. इयत्ता बारावीचा निकाल आज सोमवारी, ५ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. 
      दरम्यान यंदा जिल्हा प्रशासनाने कॉपी मुक्त अभियांनाची कडक अंमलबाजवणी केली होती. जिल्ह्यात भरारी पथक, परीक्षा केंद्रात  बैठे पथक, सर्व परीक्षा केंद्रात सिसिटीव्ही यंत्रणा, कडक पोलीस बंदोबस्त, परीक्षा केंद्र परिसरात जमाव बंदी असा बंदोबस्त होता. मात्र या उप्परही मलकापूरचा निकालाची उज्ज्वल परंपरा  कायम राखली आहे. प्राचार्य मोहम्मद जाकीर यांनी कनिष्ठ महाविद्यालय चे प्राध्यापक मोहम्मद शफीक, नईम अहेमद, निलोफर रेहाना, शफीकुर्ररहेमान, खुदेजा यास्मिन, सोहेल आमीर आभार व्यक्त केले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)