2) पिक विमा आता पर्यंत अल्प प्रमाणात जमा झाला हेक्टरी 30 हजार रुपये प्रमाणे टाकण्यात यावा.
3) दुष्काळी अनुदान 13600 संथ गतीने खात्यात टाकणे सुरू आहे. जलद गतीने दुष्काळी अनुदान खात्यात टाकावे.
महोदय,
वरील विषय असा की खरेदी संस्था मागील किती वर्षापासून शेतकऱ्यांचा माल हा हमीभावाने खरेदी करत आहे. परंतु दिनांक 15 3 2025 च्या पणन विभागाच्या पत्रानुसार या संस्थांना विना चौकशी नुसार काळ्यायादीत टाकण्यात आले आहे सदर मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यास अडचण निर्माण होत असून तुरीच्या भावामध्ये 700 ते 800 प्रति क्विंटल रुपयांची तफावत निर्माण झाली आहे या गोष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून पहिलेच शेतकरी अस्मानी सुलतानी संकटांनी घेतला असून त्यात पणन विभागाने या संस्थांना काळ्या यादीत विना चौकशी करता टाकले आहे. तसेच ज्वारी नोंदणी चे खूप शेतकऱ्यांचे अर्ज हमीभाव केंद्रावर जमा झाले असून ज्वारीची खरेदी न झाल्यास शेतकऱ्याचे 1000 ते 1200 प्रति क्विंटल नुकसान होईल तसेच 2023 , 2024, 2025 चा पिक विमा अल्प प्रमाणात जमा झाला असून काही मंडळांना पिक विम्याची रक्कम जमा झाली नसून ती रक्कम हेक्टरी 30 हजार रुपये प्रमाणे देण्यात यावी तसेच दुष्काळी अनुदान 13600 रुपये जलद गतीने खात्यात टाकावे. या गोष्टीची सरकारने गंभीर दखल घेऊन ह्या संस्था तत्काळ सुरू करण्यात याव्या मलकापूर तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांचा हा सरकारला या निवेदनामार्फत इशारा देण्यात येत आहे .सदरहून ह्या संस्था सुरू कराव्या अन्यथा येणाऱ्या 9 तारखेला मलकापूर येथील ( SDO) कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाला सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन राहील.
निवेदन देते वेळी युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे बाळूभाऊ ठाकरे सुरेश भाऊ मराठे अमोल सोनूंसे मुकुंदा घोंगटे इतर शेतकरी हजार होते .
