*उत्कृष्ट समाज निर्मितीच्या पवित्र संकल्पनेतून साकारलेली आदर्श शिक्षणाची आदर्श संस्था ग्रामीण विकास विद्यालय बेलाड चा यशस्वी उपक्रम*
प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर
मलकापुर :- अनेकांच्या सहकार्यातून व संकल्पनेतून लावण्यात येत असलेलं सायकल बचत बँक या नावाच रोपट अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गात वटवृक्षाच्या सावली सारखं काम करेल ही आशा प्रज्वलित करून आज ग्रामीण विकास विद्यालय बेलाड या शिक्षण संस्थेने बेलाड मध्ये बाहेर गावा वरून येणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता, शिक्षण महर्षी स्व.डॉ वसंतरावजी संबारे सायकल बचत बँक ही संकल्पना पूर्णत्वास आणून गावाबाहेरील शेकडो विद्यार्थ्यांना सायकल वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी
श्री एस पी बोरगावकर साहेब ( एम डी चैतन्य बायोलॉजिकल्स प्रा.लि ) यांच्या हातून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले श्री एन जे फाळके तर ( गटशिक्षणाधिकारी ) कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तथा कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री गणेश गिरी साहेब, इंजि.सचिन तायडे साहेब, श्री नारायणदास निहलानी, श्री एडवोकेट प्रवीण भोळे, डॉ.नितीन बऱ्हाटे, श्री एन बी शिंदे, श्री अरुण संबारे, श्री विश्वासराव संबारे यांच्या सह शिक्षक वर्ग, सेकडो पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
