मलकापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका मलकापूर शाखेची कार्यकारणी २०२५-२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी जाहीर करण्यात आली. या कार्यकारणीची घोषणा जिल्हाध्यक्ष श्री. सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ग्राहकांची फसवणूक होऊ नये, त्यांच्या अधिकारांबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने ग्राहक पंचायततर्फे विविध उपक्रम राबवले जातात. त्या अनुषंगाने तालुकास्तरावर कार्य सुयोग्यरीत्या पार पाडण्यासाठी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा मार्गदर्शक श्रीकांत अंधारे, जिल्हा उपाध्यक्ष संजय कस्तुरे, जिल्हा आयटीसीएल प्रमुख कैलास गणगे आदींची प्रमुख उपस्थिती लाभली.
घोषित कार्यकारणीत प्रमुख पदाधिकारी घोषित करण्यात आले यामध्ये तालुका मार्गदर्शक म्हणून हरिभाऊ पाटील अध्यक्ष म्हणून दामोदर शर्मा, उपाध्यक्ष विजय डागा, सचिव दिलीप पाटील, सहसचिव धर्मेशसिंह राजपूत, कोषाध्यक्ष ईश्वर दिक्षित, कार्यालय प्रमुख चंदनसिंह राजपूत, महिला प्रमुख शितल कोलते, विधी सल्लागार अॅड. व्यंकटेश पानमवार, आयटी सेल प्रमुख गोविंद कांडेलकर, यांसह आदींची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
संस्थेच्या कार्यात सर्व पदाधिकारी सक्रिय योगदान देतील अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी व्यक्त केली. कार्यकारणीच्या घोषणेनंतर मलकापूर तालुक्यात ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी व जनजागृतीसाठी प्रभावी पद्धतीने काम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
