बेटावद तालुका जामनेर येथील सुलेमान खान याचे हत्या ची एसआयटी मार्फत चौकशी करा

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन एव महिला अपराध नियंत्रण शाखा मुक्ताईनगर तर्फे निवेदन द्वारे मागणी....
पीडिताचे घरी जाऊन संघटनेचे पदाधिकारी यांनी केले कुटुंबाचे सांत्वन
मुक्ताईनगर(प्रतिनिधी) बेटावद तालुका जामनेर येथील सुलेमान खान याची मॉब लीचिंग  करून हत्या करण्यात आली सविस्तर वृत असे की 
बेटावद तालुका जामनेर येथे 21 वर्षीय तरुण सुलेमान खान पठाण हे तरुण पोलिस भरतीचा फार्म भरण्यासाठी जामनेरला गेला होता या वेळी त्याचा सोबत कॉलेजचे काही मित्र मैत्रिणी कॅफेत बसले होते त्या ठिकाणी 10 ते 15 लोकांची टोळी आली व त्यांनी सुलेमान खान पठाण या तरुणाला  बेदम मारहाण केली व तिथून सुलेमानला उचलून गाडी टाकून जंगलात नेले तिथे बांधून सुद्धा मारहाण केली व गाडीने गावात आणात त्याच्या घरा समोर फेकत पुन्हा आई-वडील बहिणी समोर मारहाण केली त्यात सुलेमान खान पठाण यांचा जागीच मृत्यू झाला. निवेदनात म्हटले आहे की, पीडीताचे कुटुंबाला पंचवीस लाख रुपयाचे आर्थिक मदत देण्यात यावे दोषीवर तत्काळ आणि कठोर कारवाई करावी आणि भारतीय दंड संहिता कलम 61( 2 )अंतर्गत मोकका लावण्यात यावा.कारण काही समाज कंटक देशाच्या वातावरण बिघडण्याचे काम करत आहे भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी आपण लवकर लवकर कायदा करावे असे आम्ही आपणास प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन शाखा मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर तर्फे एक मुखी मागणी करत आहे. तसेच प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार एवं महिला अपराध नियत्रंण संघटनेचे सर्व पदधिकारी यांनी बेटावद तालुका जामनेर येथील पीडिताचे घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले व संपूर्ण घटनेची माहिती घेतली पीडिताचे पिता रहीम खान पठाण यांना भेटून त्यांनी सांगितला की मला 1 मुलगा 2 मुलगी आहे. माझा मुलगा मागील वर्षी गणपती मंडळाचा अध्यक्ष होता व गावात त्याचे सलोख्याचे संबंध होते.तरी त्याची मॉब लिचिंग करून हत्या करण्यात आली.या संदर्भात सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनी जामनेर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक एम एम कासार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सर्व आरोपीवर संघटित गुन्हेगारी ॲक्ट मोकका कायदा अंतर्गत कारवाई कारवाई व पीडितांच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळून देण्याची मागणी करण्यात आली.व या संदर्भात मुक्ताईनगर तहसीलदार यांना सुद्धा निवेदन देण्यात आले.निवेदन देते वेळी,मोहन कौतिक मेढे जिल्हा अध्यक्ष, बी डी गवई ता.कार्याध्यक्ष,मणियार बिरादरी चे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी,चंद्रकांत शंकर रावाये,जगन्नाथ चांगदेवकर, जगदेव इंगळे, समाधान पाटील, राजेंद्र वानखेडे,सौ. भारती लोखंडे, अहमद ठेकेदार, अमीर चौधरी आदी उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)