(प्रतिनिधी खामगांव)
*खामगांव* - 9 ऑगस्ट रोजी खामगाव बाळापुर ते लाखनवाडा अशी फेरी असणारी बस चालू करण्यात यावी. ही बस काही कारणास्तव बंद करण्यात आलेली होती.त्याचा पाठपुरवठा गावाच्या मार्फत तसेच इतर पक्षांच्या मार्फत देखील करण्यात आला.परंतु कोणताही फायदा गावकऱ्यांना व शैक्षणिक विद्यार्थ्यांना झालेला नव्हता.हे लक्षात येताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे पश्चिम विदर्भध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हाध्यक्ष भाई संतोष इंगळे यांच्या नेतृत्वामध्ये खामगाव आगर प्रमुखांना निवेदन सादर करण्यात आले. त्या निवेदनामध्ये सदर मागणी करण्यात आली की बंद असलेली बस सेवा कायमस्वरूपी चालू करण्यात यावी. विद्यार्थी तसेच गावकऱ्यांची तारांबळ होत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे आगर प्रमुखाच्या आम्ही लक्षात आणून दिले. निवेदन दिल्याच्या नंतर बरीचशी चर्चा देखील करण्यात आली. पक्षाच्यावतीने दहा दिवसाचा अल्टिमेट देखील देण्यात आला होता. जोपर्यंत बस सेवा चालू होत नाही तोपर्यंत ठिया आंदोलन करू, असा आंदोलनाचा इशारा देताच अधिकारी यांचे धाबे दणाणले. आंदोलनाची गंभीर्याने दखल घेत आज रोजी भाई संतोषजी इंगळे यांना लेखी पत्राद्वारे कळविले. व सर्व मागण्या मान्य झाल्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे मोठे यश आहे.
*चौकट - सागर सिरसाट*
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा कार्याध्यक्ष बुलढाणा*
आंदोलनाच्या अगोदरच्या दिवशी आगर प्रमुखांना जिल्हाध्यक्ष संतोषजी इंगळे यांनी भेटून चर्चा सुद्धा झाली. आंदोलन थांबवा आम्ही आमच्या मागण्या मान्य करत आहोत. असे आगर प्रमुखांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष संतोष इंगळे यांनी आम्हाला लेखी पत्र द्या तेव्हा आम्ही ठिया आंदोलन मागे घेऊ. त्यानंतर आगर प्रमुखांनी लेखी पत्र देऊन सर्व मागण्या मान्य करून सकारात्मकतेची भूमिका दाखवली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे हे मोठे यश समजतो. जो नाद त्रास गावकऱ्यांना तसेच शैक्षणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते ते याच्यापुढे होणार नाही याचा आम्हाला आनंद आहे.
