शाहिरांमुळे डॉ. बाबासाहेबांचे विचार घराघरांत पोहोचले – भाईअशांत वानखेडे

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मलकापूर (प्रतिनिधी) मलकापूर येथे लोकशाहीर वामनदादा कर्डक व प्रतापसिंग दादा बोदडे यांच्या संयुक्त जयंती महोत्सव दी.20 ऑगस्ट रोजी महेश भवन येथे  आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समतेचे निळे वादळ संस्थापक अध्यक्ष भाईअशांत वानखेडे उपस्थित होते. तर विशेष उपस्थिती अँड.कुणालभाई वानखेडे होते.तर अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना भाईअशांत वानखेडे यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व चळवळ जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे अतुलनीय कार्य लोकशाहीरांनी केले आहे. आपल्या प्रभावी वाणी व गीतांद्वारे शाहिरांनी समाजाला जागृत केले. त्यांचे योगदान चिरस्मरणीय असून नव्या पिढीसाठी ते दीपस्तंभासारखे आहे. त्यावेळी समतेचे निळे वादळ तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार ,शहराध्यक्ष मोहन भाई खराटे ,सामाजिक कार्यकर्ते डॉ.अशोकराव सुरळकर, यांच्यासह महाकवी वामनदादा कर्डक फाउंडेशन चे अध्यक्ष विजय वानखेडे ,शाहीर विजय मोरे, शाहीर निवृत्ती तायडे, शाहीर कृष्णाजी सुरळकर, देविदास मोरे ,पुंडलिक मोरे ,कमलेशभाऊ धुरंदर, भिकाजी तायडे ,शाहीर भिकाजी तायडे, मधुकर इंगळे, सदानंद मोरे, शाहीर डी .आर.इंगळे, स्वर सम्राट कुणाल बोदडे, सुरेश सुरवाडे ,सामाजिक कार्यकर्ते यशवंत कडासे, गायिका रीता खंडारे , या प्रसंगी स्थानिक मान्यवर,शाहीर  सामाजिक कार्यकर्ते, साहित्यप्रेमी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात शाहिरांच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला तसेच त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा संदेशही देण्यात आला
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक एन. के.हिवराळे यांनी केले तर सूत्रसंचालन सुप्रसिद्ध गायक दिलीप इंगळे यांनी केले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)