मलकापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

       मलकापुर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने  शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी दहा वाजता
 क्रांती दिना निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
   भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या विरोधात *चलेजाव* चे आंदोलन छेडले असता संपूर्ण भारतवासी यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता त्यामुळे इंग्रज सरकारवर फार मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला होता त्यामुळे आपल्याला दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. परंतु 9 ऑगस्ट 1947 च्या या चलेजाव आंदोलनात या अनेक  नागरिकांनी व युवकांनी हौतात्म्य पत्करले त्यांची आठवण म्हणुन त्यांना अभिवादन करण्याकरिता मलकापुर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते  सर्वप्रथम हुतात्म्यांना पुष्पचक्र व कॅण्डलद्वारे अभिवादन करण्यात आले
    या अभिवादन कार्यक्रमात  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित सरचिटणीस डॉक्टर अरविंद कोलते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हरीश भाऊ रावळ, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष  हाजी रशीद खान जमादार , माजी नगराध्यक्ष शाम भाऊ राठी,  महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस अताऊर रहेमान जमादार सर, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष युसूफखान उस्मानखान , गटनेते राजेंद्र वाडेकर , बुलढाणा जिल्हा मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद दादा अवसरमोल , माजी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजू पाटील , माजी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बंडूभाऊ चौधरी, माजी नगराध्यक्ष एडवोकेट मजीद कुरेशी, घनश्याम भाऊ पुरोहित , सनाल्लाखा जमादार , ज्ञानदेव हिवाळे, ज्ञानदेव तायडे , हाजी उस्मान मास्तर, जाकिर मेमन , विनय काळे , वाजिद खान , साजिद खान , अशोक जाजू , विजू बाप्पा निर्मल , एजाज शहा , फिरोज खान, कैलास ताठे , अजमत जमादार , रोहन देशमुख, इस्तियाक जमादार, राजेंद्र वानखेडे, रऊफ शेठ बागवान, अनिल तांदूळकर , अशोक मराठे, शेरखान, जावेद ठेकेदार , जुबेर तंवर, गोपाल तांदुळे, सादिक शेख इत्यादींसह मलकापुर शहर  व ग्रामीण मधील नागरिकांनी तसेच काँग्रेसच्या सर्व  संघटनांचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यां ची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन  शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी  10:00 वाजता हुतात्मा स्मारक तहसील चौक,  मलकापुर  
आयोजक:
 हाजी रईसखान जमादार
 अध्यक्ष  मलकापुर शहर काँग्रेस कमिटी.
       
 अनिल भारंबे
 अध्यक्ष   मलकापुर तालुका काँग्रेसकमिटी* . यांनी केले होते

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)