मुंबई इस्लामी जिमखाना येथे कुरेश कॉन्फरन्स रजिस्टरची राज्यव्यापी बैठक

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 महाराष्ट्र वोर्किंग प्रेसिडेंट बुलडाणा सुपुत्र जाकीर हुसेन कुरेशी यांची महत्वाची कामगिरो
मुंबई, दि. ७ सप्टेंबर २०२५ :
मुंबई इस्लामी जिमखाना येथे रविवारी कुरेश कॉन्फरन्स रजिस्टर या सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण राज्यव्यापी बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. सनौबर अली कुरेशी (दिल्ली) यांनी भूषविले.
सदर बैठकीस मुख्य अतिथी म्हणून बॉम्बे उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती न्यायमूर्ती अभय थिप्से, अ‍ॅड. फराहाना शाह, उमर अन्सारी साहेब, आसिफ कुरेशी साहेब व शाहीदा बाई हे विशेष उपस्थित होते.
बैठकीत गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या जनावर खरेदी-विक्री बंद आंदोलनाची समीक्षा करण्यात आली. शेतकरी, व्यापारी व कुरेशी समाजाच्या व्यापाराच्या हक्कांचे रक्षण, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय उन्नतीसाठी कायदेशीर व सकारात्मक प्रयत्न सातत्याने करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. 
तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसेस व इतर मागण्यांसाठी संघटनेमार्फत एकत्रित प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
या वेळी मोहम्मद जाकीर हुसेन कुरेशी (वर्किंग प्रेसिडेंट, महाराष्ट्र), अ‍ॅड. वसीम कुरेशी (प्रवक्ते, महाराष्ट्र), हाजी निसार कुरेशी (महाराष्ट्र सचिव – रावेर), अ‍ॅड. अजीम कुरेशी (औरंगाबाद जिल्हा) यांनी आपली मते व मनोगत व्यक्त केले.
तसेच महिला विभागातर्फे मोईन खलील अहमद कुरेशी (राष्ट्रीय महिला विभाग अध्यक्ष), रोशन आरा कुरेशी (महाराष्ट्र राज्य अध्यक्षा), डॉ. मुनीरा कुरेशी (महासचिव, महाराष्ट्र), गझाला आझाद (राज्य सल्लागार), हिना कुरेशी (उपाध्यक्षा, मुंबई), अ‍ॅड. तबस्सुम मेहताब कुरेशी (अध्यक्ष, मुंबई), रेशमा कुरेशी (अध्यक्ष, लोणावळा) व शबनम शाहीद कुरेशी (उपाध्यक्षा, मुंबई) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
जिल्हा व तालुका पातळीवरूनही अनेक मान्यवर उपस्थित होते –
🔸 अकोला जिल्हा : इंजि. शारीक रफिक कुरेशी (पोर्टल ऑब्झर्व्हर), इंजि. शेख गुलाब (मुम्बरा सामाजिक कार्यकर्ता)
🔸 बुलडाणा जिल्हा : सय्यद आझेम कुरेशी (जिल्हाध्यक्ष), समद कुरेशी (युवा अध्यक्ष), सबीर कुरेशी (सदस्य), आबिद खान कुरेशी (सदस्य)
🔸 बीड जिल्हा : कादर पाशा कुरेशी (जिल्हाध्यक्ष), जावेद कुरेशी (उपाध्यक्ष), अलीशेर कुरेशी (गाईड), उमर कुरेशी (जिल्हा सचिव), मुखीद कुरेशी (खजिनदार), जमीन कुरेशी (गाईड)
पारळी (बीड) : फैजल कुरेशी (तालुका अध्यक्ष), महेबुब कुरेशी (शहराध्यक्ष), गाउस कुरेशी (शहर उपाध्यक्ष)
🔸 परभणी जिल्हा : मोबिन कुरेशी (जिल्हाध्यक्ष), अ‍ॅड. मुस्तफा कुरेशी (महासचिव)
गंगाखेड (परभणी) : यकीन कुरेशी (शहर उपाध्यक्ष), महेबुब कुरेशी (तालुका सचिव)
🔸 चंद्रपूर जिल्हा : अब्दुल रज्जाक अब्दुल इस्माईल कुरेशी (जिल्हाध्यक्ष), अब्दुल करीम अब्दुल सत्तार कुरेशी (शहराध्यक्ष), अब्दुल झावीद अब्दुल मुख्तर कुरेशी (सदस्य)
गडचांदूर (चंद्रपूर) : अब्दुल अझिज अब्दुल मुनाफ कुरेशी (अध्यक्ष), शेख अल्ताफ शेख अन्वर कुरेशी (सदस्य)
🔸 हिंगोली जिल्हा : गफ्फार अब्दुल रहमान कुरेशी (जिल्हाध्यक्ष), मोहम्मद रफी कुरेशी (उपाध्यक्ष), शब्बीर कुरेशी (तालुका अध्यक्ष – कळमनुरी), मोहम्मद गाउस कुरेशी (युवा तालुका अध्यक्ष – वसमत), एजाज कुरेशी (सदस्य – कळमनुरी)
🔸 जळगाव जिल्हा : अमजद कुरेशी (अदावद सदस्य), गफुर कुरेशी (अदावद सदस्य), शेख आसिफ शेख अकबर (खंडेश संयोजक)
सर्व उपस्थितांनी आपापले मनोगत व मार्गदर्शन व्यक्त करून समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व राजकीय उन्नतीसाठी एकत्रित लढा देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकर्षक पद्धतीने अड वसीम बिस्मिल्लाह कुरेशी महाराष्ट्र प्रवक्ते यांनी पार पडले. बैठक यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योगदान दिले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)