स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मलकापूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.प्रलंबित पिक विमा व कीड नुकसानीसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा.

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
मलकापूर, १५ सप्टेंबर २०२५: बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, आज मलकापूर उपविभागीय अधिकारी (SDO) यांना हुमणीअळी व येलोमोझ्याक कीटकांमुळे होणाऱ्या नुकसानीसह प्रलंबित पिक विमा दाव्यांसाठी निवेदन देण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखडे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप हंगामात हुमणीअळी व येलोमोझ्याकसारख्या कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीन, कापूस व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय, प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे दावे अजूनही प्रलंबित आहेत. संघटनेने दिलेल्या निवेदनात या कीटकांच्या नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना, नुकसान भरपाईची तपासणी व पिक विमा दाव्यांचे त्वरित निपटारे करण्याची मागणी करण्यात आली आहे. निलेश नारखडे म्हणाले, "शेतकरी हा देशाचा कणा आहे, पण सरकारकडून त्यांना योग्य न्याय मिळत नाही. जिल्ह्यात लाखो शेतकऱ्यांचे पिक विमा दावे प्रलंबित असून, कीटकांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणखी खालावली आहे. आम्ही शांततापूर्ण मार्गाने मागण्या मांडत आहोत, पण न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरण्याशिवाय आम्हाला गत राहणार नाही. पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुमारे ६२८ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असली तरी अनेक दावे अजूनही प्रलंबित आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. SDO कार्यालयातील या निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी व स्थानिक शेतकरी उपस्थित होते. प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याची अपेक्षा आहे निवेदन देते वेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे जिल्हा उपाध्यक्ष बाळूभाऊ ठाकरे मलकापूर तालुकाध्यक्ष गोपाल सातव नांदुरा तालुकाध्यक्ष रामदास डोसे युवा तालुकाध्यक्ष गोलू पाटील वडजी शाखा अध्यक्ष पराग बोंडे युवा शेतकरी गोपाल रायपूरे व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)