शिवसेना (उ.बा. ठा) मलकापूर तालुका प्रमुखांसह दाताळा येथील शेतकऱ्यांचा पालकमंत्री मा. मकरंदजी (आबा) पाटील यांना घेराव.

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मलकापूर:पालकमंत्री मा.मकरंद (आबा) पाटील यांचा मलकापूर तालुका दौऱ्याची संधी साधून मलकापुरात प्रवेश करत असतांना दाताळा येथे शिवसेना मलकापूर तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी घेराव घातला. या बाबत सविस्तर वृत्त असे की, दाताळा येथे शेतकऱ्यांना शेतीला जोडणारा पूल काही दिवसांआधी वाहून गेल्याने शेतकऱ्यांची शेतीची नाळ तुटली. त्यामुळे तेथून जनावरांना चारा पाणी आणणे शक्य होत नाही, जनावरांचे अतोनात हाल होत आहे, तसच तोंडाशी आलेले शेतकऱ्यांचे पीक देखील काढण्याकरिता शेतकऱ्यांना शेतात जात येत नाही. त्या पुलाचे (बॉक्स कलव्हर्ट) चे निकृष्ट दर्जाचे काम व चुकीचे अंदाजपत्रक तथा चुकीचा आराखडा, मृद व जल संधारणा विभागामार्फत करण्यात आला असल्याचा आरोप बाबत उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना तक्रार देण्यात आलेली होती. पालकमंत्री तालुक्यात येणार असल्याची संधी साधून तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना दाताळा येथे घेराव घातला. संतप्त शेतकऱ्यांनी पालकमंत्रांना बॉक्स कलव्हर्ट वर प्रत्यक्ष चालण्याचा आग्रह धरला, शिवसैनिकांच्या संतप्त भावना बघता स्थानिक रा. काँ. जिल्हा कार्याध्यक्ष प्रसादभाऊ जाधव, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष रफिक खान, अँड शोएब शेख, राजुभाऊ साठे, राहुल जाधव, बाळुभाऊ पाटील, बाळासाहेब दामोदर सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना तालुका प्रमुखांसह शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, विषयाचे गांभीर्य लक्षात घेत पालकमंत्र्यांनी देखील तत्काळ तहसीलदारांना विश्राम गृह मलकापूर संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेण्याचे सांगितले व शिवसैनिकांसह शेतकऱ्यांना विश्राम गृह येथे बोलावले. 
पालकमंत्र्यांनी विश्राम गृह मलकापूर येथे पुलाची ठोस दुरुस्तीचे करण्याचे आदेश निर्गमित केले तथा तात्पुरता येण्याजान्या साठी तात्काळ व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले, त्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील, यांच्या सह किशोर सिंह राजपूत, गोपाळ पाटील, प्रवीण पाचपोर, सुभाष पाटील, कैलास इंगळे, भावसिंग राजपूत, दशरथ सिंग राजपूत, सोपान तळोले, दिनकर तळोले, प्रशांत तळोले, कुणालसिंग राजपूत, भगवान नारखेडे, सोपान नारखेडे, गजानन कोल्हे, धनराज कोल्हे, पुरुषोत्तम पाटील, प्रकाश सुषिर, पुरुषोत्तम पाटील, निलेश सुशीर, अतुल सिंह राजपूत, मधुकर तळोले, व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)