दाताळा ग्राम मलकापूर तालुका येथील जिल्हा जलसंधारण विभागाने बांधलेला पूल गेला वाहून ...

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
मलकापूर: नळगंगा नदीवरील तालुक्यातील शिराढोण शिवारात निकृष्ठ बॉक्स कल्व्हर्टचे (छोटा पुल) चे काम निकृष्ठ करून त्यावर कार्यवाही न करता, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बुलढाणा जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्या खुर्चीला हार घालून खाली खुर्चीची आरती करून ते हरवल्या बाबतची तक्रार शिवसेना (उबाठा) मलकापूर तालुका प्रमुख दिपक चांभारे यांचेसह शेतकरी व शिवसैनिकांनी बुलढाणा शहर पो. स्टे. ला केल्यानंतर, दिलेल्या अल्टिमेटम च्या आधी शिरढोण येथे जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी बॉक्स कल्व्हर्टचे च्या ठोस दुरुस्तीचे काम केले. सदर काम शिवसेना (उबाठा) च्या दणक्याने "ना अंदाजपत्रक ना निविदा" तरीही तत्काळ पावसाळ्या पूर्वी पूर्ण, ही बाब पंचक्रोशीतील गावकऱ्यांना सर्वश्रुत आहे.
दाताळा येथील शेतकऱ्यांना शेतीला जोडणारा पूल वाहून गेल्याने त्यांनी मोठ्या आशेने शिवसेना तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांना संपर्क केला असता ते तत्काळ असंख्य शिवसैनिकांसह दाताळा येथे पुलावर जमा झाले व पुलाची पाहणी केली, सर्वांनी गावकऱ्यांसह तत्काळ  उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर माहिती त्यांना दिली.
मौजे दाताळा ता. मलकापुर येथे नळगंगा नदी पात्रामध्ये मे २०२३ मध्ये  हयुम पाईप बॉक्स कल्व्हर्टचे काम मृद व जलसंधारण विभागामार्फत करण्यात आले. बांधलेल्या पुलाचे काम हे कमी उंचीचे व त्यामध्ये टाकलेले सिमेंट पाईप हे लहान आकाराचे टाकले होते. सदर बॉक्स कल्व्हर्टची लांबी ही नदी पात्रा पेक्षा कमी असल्याने २०२४ मध्ये नळगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजुंचा ऑप्रोच खरडुन गेला व रहदारीचा रस्ता बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांनी वर्गणी करून खरडलेल्या ठिकाणी तेथीलच बाजुची माती खोदुन रस्त्यामध्ये भराव टाकु रस्ता तात्पुरता रहदारीस सुरू केला होता.
तरी योग्य तो पक्का रस्त्याबद्दल विभागाने कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे तेथील शेतकर्‍यांना शेतीचे अवजारे शेतात नेता येत नसल्याने त्या भागातील शेतकऱ्यांचा शेतमाल काढणीस येवून सुध्दा त्या मालाला घरी नेता आले नव्हते. काढणीस आलेला शेतमाल पावसामुळे जागेवरच शेतात खराब झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
सदर नदीपात्रातील रस्त्याची रहदारी ही सुरळीत असती तर काढणीस आलेला शेत माल हा बऱ्या पैकी तयार होवुन शेतकऱ्यांचे नुकसान टाळता आले असते. परंतु मृद व जलसंधारण विभागाच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षीतपणामुळे, त्या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले व त्यांनी केलेली मेहनत व्यर्थ गेलेली आहे.
तेथील शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव शेवटी आत्महत्ये शिवाय पर्याय शिल्लक राहिला आहे. तरी या वर्षी शेतकऱ्यांचे पुढील नुकसान टाळण्याकरीता बंद असलेला रस्ता चांगल्या दर्जाचा तत्काळ सुरू करून द्यावा तसेच झालेल्या नुकसानाची, नुकसान भरपाई द्यावी तथा संबंधीत कंत्राटदार व अधिकारी यांच्या वर कठोर कार्यवाही करावी. 
अन्यथा ग्रामस्थ व शिवसैनीक हे सदर तीव्र आंदोलन करतील व नंतरच्या परिणामास आपणच जवाबदार राहाल.
असे निवेदन उपविभागीय अधिकारी, मलकापूर यांना देण्यात आले. त्यावेळेस दिपक चांभारे पाटील,
शिवसेना, मलकापूर तालुकाप्रमुख, राजेंद्र काजळे तालुका उपप्रमुख, प्रवीण पाचपोर, सुभाष पाटील, कैलास इंगळे, भावसिंग राजपूत, दशरथ सिंग राजपूत, सोपान तळोले, दिनकर तळोले, प्रशांत तळोले, भगवान नारखेडे, सोपान नारखेडे, गजानन कोल्हे, धनराज कोल्हे, पुरुषोत्तम पाटील, प्रकाश सुषिर, पुरुषोत्तम पाटील, किशोर सिंह राजपूत, गोपाळ पाटील, निलेश सुशीर, अतुल सिंह राजपूत, मधुकर तळोले, व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. 

दाताळा येथील पुलाच्या व रस्त्याच्या दुरुस्ती ठोस काम तत्काळ न झाल्यास आता गांधीगिरी नाही, भगतसिंगांच्या मार्गाने जिल्हा जल संधारणा अधिकाऱ्यांकडून काम करून घेऊ...!
-- दिपक चांभारे पाटील
तालुका प्रमुख, शिवसेना (उबाठा)
मलकापूर, जिल्हा मातृतीर्थ बुलढाणा.l

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)