कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आंदोलनाला सीटूचा पाठिंबा बुलडाणा जिल्हाधिकारी, यांच्या मार्फत मा आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दिले पाठिंब्याचे निवेदन

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

   गेल्या १५ दिवसापासून  सेवेत कायम स्वरुपी समायोजन करण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन जिल्ह्यातील  कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी हे आंदोलन करित आहेत.त्यांच्या या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घेऊन त्यांना सेवेत कायम करावे.यासाठी आज सीटूच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांनी आज जिल्हाधिकारी मा.श्री. किरण पाटील यांना निवेदन दिले.सदर निवेदन हे मा.आरोग्य व कुटुब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले.सरकारने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा सीटू या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात जिल्ह्यात सर्व शक्तीनिशी सहभागी होईल असा इशारा यावेळी सीटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांनी पाठिंबा देताना सरकारला दिला.यावेळी निवेदन देताना संघरत्न साळवे, मनिषा बोराडे,मेघा पारस्कर, दत्तात्रय गायकवाड,गौरव वानखेडे,स्वाती गावंडे इत्यादी उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 
राहुल पाटील मुंढे
खामगाव
9423760528

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)