धोकादायक शालेय इमारत व संरक्षण भिंतीअभावी विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात!

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

संग्रामपूर 
तालुक्यातील जि.प. उर्दु पूर्व माध्यमिक शाळा, पातूर्डा बु. येथील इमारत धोकादायक अवस्थेत पोहोचली असून सुमारे ३०० विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षण घेत आहेत.

शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत इमारतीची पाहणी करण्यात आली असता, फर्स्ट फ्लोअरवरील छताचा प्लास्टर गळत असून जिन्याच्या स्लॅबवरून सिमेंट निघत आहे. मागील भिंत जीर्ण झाल्याने ती कोसळण्याच्या स्थितीत आहे. पावसाळ्यात छतावरून पाणी झिरपत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. परिणामी फर्स्ट फ्लोअरवरील वर्गखोल्या वापरणे बंद करण्यात आले आहे.

याशिवाय, शाळेला संरक्षण भिंत नसल्याने आणखी एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शाळेसमोर खंड़वी – उखडगाव महामार्ग असून रोजच्या रोज विद्यार्थी हा मार्ग ओलांडतात. परंतु शाळेसमोर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) नसल्याने अपघाताचा धोका नेहमीच डोळ्यांसमोर उभा राहतो.

शाळा व्यवस्थापन समितीने या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बुलढाणा यांना निवेदन दिले असून तातडीने संरक्षण भिंत बांधून देणे, गतिरोधक बसविणे तसेच शाळेच्या इमारतीची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

सदर निवेदनाची प्रत मा. जिल्हाधिकारी, शिक्षण अधिकारी, गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी तसेच ग्रामपंचायत पातूर्डा बु. यांना देखील पाठविण्यात आली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)