मलकापूर मलकापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे व अनेकांच्या घरांचे अतोनात नुकसान झाले आहे यामुळे सर्व शेतकरी व नूकसानग्रस्त नागरिक यांना पंचनामे करून तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणिचे निवेदन उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालूका व शहराच्या वतीने आज 17 सप्टेंबर रोजी देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून मलकापूर शहर व तालुक्यात मूसळधार पाऊस कोसळला आहे या अतिवृष्टीमुळे नदीनाले ओवरफ्लोव होत शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
तसेच शहरातील सूभाषचंद्र बोस नगर,सालीपूरा, पंतनगर, आंबेडकर नगर, विकास नगर,फातेमा नगर, हाशमी नगर,ताज नगर आदिंसह अनेक भागात घरात पाणी घूसल्याने, भिंती पडल्याने, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या सर्व नूकसानग्रस्त शेती व घरांचे पंचनामे करून तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
माजी आमदार वसंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसादराव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अरुण अग्रवाल, अँड शोएब शेख,तालूका अध्यक्ष राजूभाऊ साठे,शहर अध्यक्ष राजू डोफे, अमृत काटकर, विजय वानखेडे, प्रल्हाद ढोले,सौ लताताई वानखेडे, संगिता ताई गांगूर्डे, सोनिया परयाणि, रविंद्र गव्हाळे, राहूल जाधव,डल्ला पहेलवान, श्रावण वाघ, ईमरान बासा अण्णा गायकवाड,अनंता गायकवाड, शेख ईमरान, हबीब चव्हाण,संतोष थोरबोले, मंगल चव्हाण, दिनकर इंगळे, शिवाजी सूरंशे, अमोल ओगले, विलास ओगले,अर्जून तायडे, संदीप तायडे,रवि गणतिरे,शेख हमिद, मेहबूब खान, आदींसह अनेक शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
