इकरा शिक्षण संस्था संचलित जळगांव संचलित अब्दुल मजिद सालार ईकरा उर्दू हायस्कूल बोरनार येथे ओझोन दिवस साजरा करण्यात आला.विज्ञान विभागप्रमुख आरिफ मोहम्मद खान यांनी ओझोन दिन व ओझोन स्तराची सविस्तर माहिती दिली. दहावीच्या विद्यार्थिनींनी—सायमा रईस पटेल, नाजीया रमजान खाटीक, दानिया अब्दुल रहीम देशमुख यांनी ओझोन स्तराचे महत्त्व, छिद्र आणि होणारे नुकसान यावर प्रकाश टाकून उपाय सांगितले.
पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये "ओझोन स्तराचे महत्त्व" या विषयावर पोस्टर स्पर्धा झाली. पाचवी ते सातवी गटात आफरीन हनीफ पटेल (सहावी) प्रथम, सऊद सादिक देशमुख (सहावी) द्वितीय, आणि इरम इकबाल (सातवी) तृतीय क्रमांक मिळवला. आठवी ते दहावी गटात अशमीरा आदिल देशमुख (नववी), शाहिस्ता हनीफ पटेल (दहावी), शिफा असलम पठाण (आठवी) अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.
सर्व विजेत्यांना शाळेचे मुख्याध्यापक सलीम शाह व सहायक शिक्षक आबिद हुसेन यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. पोस्टरचे परीक्षण विज्ञान शिक्षक शेख रोशन जाफर आणि अमीर शेख हमीद यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभले. संस्था अध्यक्ष आणि सदस्यांनी मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षकांचे अभिनंदन केले, तसेच विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.
