बुलढाणा पर्यावरण संरक्षण व हरित बुलढाण्याच्या दिशेने वाटचाल करत वसुंधरा ग्रुप तर्फे बुलढाणा शहरातील क्रीडा संकुल परिसरात वृक्षारोपण संकल्प हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत दररोज 10 ते 15 झाडांची लागवड करण्यात येत आहे.
या उपक्रमात वसुंधरा ग्रुपचे स्वयंसेवक, स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. वृक्षलागवडीसाठी देशी आणि पर्यावरणपूरक जातींची निवड करण्यात आली असून, प्रत्येक झाडाची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र पालक नेमण्यात आले आहेत.
वसुंधरा ग्रुपचे प्रतिनिधी सांगतात की, "हे केवळ वृक्षारोपण नाही, तर पुढील पिढीसाठी एक हरित भविष्य तयार करण्याचा संकल्प आहे. दररोज झाडं लावून त्यांचे संगोपन करत शहराचे तापमान कमी करणे, जैवविविधतेला चालना देणे आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे हे आमचे उद्दिष्ट आहे."
या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून इतर संस्थांनाही यात सहभागी होण्याचे आवाहान केले आहे
