बुलढाणा ते दिनांक 19 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मा डॉ राजेंद्र शिंगणे साहेब होते. या बैठकीमध्ये काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार)  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे पदाधिकारी यांनी नपा, जीप व पस च्या येणाऱ्या निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली व जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या पक्षाने एकत्रितपणे निवडणूक लढवावी अशा प्रकारचा निर्णय झाला. यावेळी प्रत्येक तालुक्यास्तरावरील सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले विचार मांडले. त्यामुळे सामूहिकरीत्या हा निर्णय घेण्यात आला. 
         यावेळी मा डॉ राजेंद्र शिंगणे साहेब मा राहुलभाऊ बोंद्रे मा धीरज लिंगाडे मा सिद्धार्थ खरात साहेब मा प्रा नरेंद्र खेडेकर मा जालिंदर बुधवत मा राजेश एकडे मा श्यामभाऊ उमाळकर मा लक्ष्मण दादा घुमरे मा प्रसन्नजीत पाटील. इत्यादींनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा नरेश शेळके कार्यक्रमाचे संचलन मा पी एन जाधव व आभार मा सौ जयश्रीताई शेळके यांनी मानले. 
        यावेळी व्यासपीठावर माननीय नानाभाऊ कोकरे मा भास्करराव काळे मा सौ स्वातीताई  वाकेकर मा वसंतराव भोजने मा दिलीप जाधव  मा बी टी जाधव मा संगीतराव भोंगळ मा पांडुरंग पाटील मा प्रकाश पाटील इ उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)