मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मनियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी यांच्या साळ्याच्या लग्नात "जेल भरो आंदोलन"ला समर्थन देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी "ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड" यांच्या मार्गदर्शनाखाली वक्फ बचाव समिती, जळगाव यांच्या वतीने जळगाव येथे होणाऱ्या धरना आंदोलन आणि जेल भरो आंदोलनाची दावत देण्यात आली.
या प्रसंगी वर सैय्यद जाहिद सैय्यद जमील (भुसावळ) यांच्या हस्ते "जेल भरो आंदोलन समर्थन" असा पोस्टर देण्यात आला आणि लग्न समारंभात उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येतील लोकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
मंचावर जळगाव वक्फ बचाव समितीचे समन्वयक फारुक शेख साहेब यांनी वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाविरुद्ध जोरदार आवाज उठवला आणि आगामी 27 ऑक्टोबर रोजी जळगाव येथे होणाऱ्या “धरना आंदोलन व जेल भरो आंदोलन”मध्ये सहभागी होण्याची घोषणा केली. त्यांनी लग्नात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना आवाहन केले की, त्यांनी मोठ्या संख्येने जळगाव येथे पोहोचून आंदोलन यशस्वी करावे.
या लग्न समारंभात उपस्थित लोकांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आणि ऐक्याचे प्रदर्शन केले. या प्रसंगी मनियार बिरादरीचे जिल्हाध्यक्ष फारुक शेख, जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी, शिवसेना (शिंदे गट) चे महाराष्ट्र अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, समाजसेवक मुख्तार खान, समाजसेवक आसिफ पेंटर, जमील सैय्यद, सैय्यद मुस्तकीम, साजिद रौशन, साजिद बागवान, मजीद बागवान,कालू पहलवान, ताहेर शेख जळगांव, रऊफ टेलर जळगाव,तैय्यब मणियार जळगांव, कलीम मनियार, अहेमद ठेकेदार, ऍड मस्तकीम मन्यार, रिजवान मण्यार, फैजान मण्यार,सय्यद जाहीद, साजिद मनियार (नाशिक), सईद मनियार (सेलांबा), मोहसीन मनियार, मतीन भाई, अमीर चौधरी आदी समाजातील मान्यवर उपस्थित होते.
