मलकापूर: विधानसभा मधील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत विविध गावांमधील कास्तकारांसह (मोमिनाबाद, मेंढळी, जवळा, खैरा, बेलुरा, पिंपळखुटा बु, लासुरा, पिंपळखुटा खु., निमखेड, मोरखेड) सह आदि गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील खांब्यावरील विद्युत तार चोरट्यांनी लंपास केल्यास असून, त्या तात्काळ बसवून देण्याची मागणी शिवसेना (उबाठा) माजी जिल्हाप्रमुख वसंतरावजी भोजने यांच्या नेतृत्वात शिवसेना (उबाठा) पदाधिकारी व शेतकऱ्यांनी म.रा.वि.वि कार्यकारी अभियंता आर. जि. तायडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, मलकापूर नांदुरा विधानसभा मधील उपरोक्त गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील खांबावरील विद्युत तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या असून शेतकऱ्यांना त्या तार तात्काळ लावून देण्यात याव्यात तसेच लासुरा येथील पुरुषोत्तम गारमोडे यांचे शेतातील तार जमिनी पर्यंत झुकले आहेत, मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा, निमखेड, मोरखेड दाताळा या भागातील लाईट नेहमी ये-जा करते, शिवाजी ढोरे जिगाव यांना नवीन विद्युत कनेक्शन बाबत, मलकापुर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील हनुमान नगर बर्फ कारखान्याजवळील १०० केव्हीची डीपी बदलून २०० के. व्ही ची करणेबाबत, अनुराबाद ता. मलकापूर येथील विश्वनाथ श्रीराम ढगे यांच्या बैलाचा ईले शॉक लागून सन २०२२ मध्ये बैल दगावला होता अद्याप ही त्या शेतकऱ्यास आर्थिक मदत मिळाली नाही, वाकोडी, दुधलगाव ता. मलकापूर परीसरात लोखंडी पोल जमिनीपासून जीर्ण झाले आहेत ते बदलविणे बाबत, जांभुळधाबा येथील सुनील पाटील यांच्या शेतात विद्युत तार खाली पडल्याने त्यांच्या शेतातील ठिबकचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांना मोबदला भेटण्याबाबत, मलकापुर न. प हद्दीतील चिकारा प्लॉट मधील रस्त्याच्या मध्ये असलेले ईले. पोल हटविण्याबाबत आदी समस्यांचे निवेदन देण्यात आले असून, या समस्या तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली आहे. निवेदनावर उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, मलकापूर तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील, नांदुरा तालुकाप्रमुख ईश्वर पांडव, शहरप्रमुख हरीदास गणबास, युवासेना तालुकाप्रमुख पवन गरुड, उपतालुकाप्रमुख राजेंद्र काजळे व समद कुरेशी, विभाग प्रमुख गणेश सुशीर, चांद चव्हाण, महेंद्र डोफे, नितीन सोमस्कार, देविदास रत्नपारखी, प्रमोद खांदे, ज्ञानेश्वर डोफे, निखिल सुरडकर, अरुण नवथळे, वसंता गायकवाड, संजय डोफे, निवृत्ती कोल्हे, अक्षय खांदे सह शेतकरी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.
