दि.30 सष्टेबर 2025 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी साहेब जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 यांच्या मार्फत गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
  या निवेदनात केरळ भाजपा प्रवक्ते पिंटू महादेवन यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करणे देशातील कोट्यवधी गरीब, वंचित आणि मागास समाजाचा खरा आवाज बनलेले विरोधी पक्षनेते मा. खासदार राहुल गांधीजी यांना भाजप आणि आरएसएसच्या वैचारिक प्रयोगशाळेतून तयार झालेल्या केरळच्या प्रवक्त्याने केलेले "छातीत गोळ्या घालण्याचे" वक्तव्य करणे हा अत्यंत संतापजनक, घृणास्पद आणि लोकशाहीला काळिमा फासणारा प्रकार आहे.

महात्मा गांधींचा तिरस्कार करणाऱ्या विचारसरणीतून गरीब-शोषितांचा हक्क जपणाऱ्या नेत्याला खुलेआम धमकी दिली जात असेल तर हे गंभीर आहे. लोकशाहीत विचारांच्या लढाईला गोळीचा पर्याय देणारे हे वक्तव्य केवळ जननायक राहुल गांधी यांच्याविरुद्ध नसून संपूर्ण लोकशाही व्यवस्थेविरुद्धचे षडयंत्र आहे.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते या राहुलजी गांधी यांना छातीत गोळ्या घालून मारण्याची धमकी देणाऱ्या केरळ येथील भाजपा प्रवक्ते पिंटू महादेव यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रतिचे निवेदन देण्यात आले.
  या निवेदन प्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)