कोलते महाविद्यालयात एआयसीटीई अटल अकॅडमी प्रायोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि थ्री-डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी’ विषयावर राष्ट्रीय स्तरावरील प्राध्यापक विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील यांत्रिकी पॉलिटेक्निक विभागात “स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि थ्री-डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी” या विषयावर एआयसीटीई अटल अकॅडमी प्रायोजित राष्ट्रीय स्तरावरील प्राध्यापक विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम ६ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला असून, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाविषयी अध्यापकांना सखोल प्रशिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. एम. बी. दायगवाणे, संयुक्त संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, नागपूर यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जी. के. आवारी, विभाग प्रमुख (ऑटोमोबाईल),  शासकीय पॉलिटेक्निक नागपूर; डॉ. (श्रीमती) दायगवाणे, विभाग प्रमुख ( इलेक्ट्रिकल) जी एच रायसोनी सीओइ, नागपुर; डॉ. युगेश खर्चे, प्रशासकीय डीन; प्रा. आर. एम. चौधरी, आयक्यूएसी समन्वयक; तसेच प्रा. एस. एन. खाचणे विभाग प्रमुख (उपयोजित विज्ञान) यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिल खर्चे होते.

उद्घाटन सत्रात डॉ. दायगवाणे यांनी अध्यापकांनी सतत नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेत शिक्षण अधिक परिणामकारक करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर डॉ. जी. के. आवारी यांनी “इंट्रोडक्शन टू स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग या विषयावर व्याख्यान दिले. सत्राच्या शेवटी श्री. एस. आर. मुंडाले, व्याख्याता, यांत्रिकी विभाग यांनी थ्री-डी प्रिंटिंग मॉडेलवरील प्रत्यक्ष हाताळणी सत्र घेऊन सहभागींचे मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी “प्लाझ्मा टेक्नॉलॉजी इन मॅन्युफॅक्चरिंग” या विषयावर डॉ. डी. एस. पाटील, प्राध्यापक, मेटलर्जिकल इंजिनिअरिंग विभाग, आयआयटी मुंबई यांनी सखोल माहिती दिली. त्यानंतर “फंडामेंटल्स ऑफ थ्री-डी प्रिंटिंग अँड अ‍ॅडिटिव मॅन्युफॅक्चरिंग” या विषयावर डॉ. अरविंद जोशी, संचालक, सीआयपीईटी, चंद्रपूर यांनी सत्र घेतले.

तिसऱ्या दिवशी डॉ. विशाल आंबाडे, प्राध्यापक, टीजीपीसीईटी, नागपूर यांनी “स्लायसिंग सॉफ्टवेअर अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज इन थ्री-डी प्रिंटिंग” या विषयावर प्रात्यक्षिक सत्र घेतले. त्याच दिवशी प्रा. डी. पी. खरात आणि श्री. एस. आर.  मुंडाले यांनी थ्री-डी प्रिंटरवरील हाताळणी सत्राद्वारे अध्यापकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले.

चौथ्या दिवशी “थ्री-डी प्रिंटिंग सॉफ्टवेअर अँड सिम्युलेशन टूल्स” या विषयावर श्री. अभिजीत राऊत, संचालक व मास्टर ट्रेनर, थ्री-डी प्रिंटिंग नागपूर यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर “इंडस्ट्रियल आयओटी इन स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग” या विषयावर श्री. ओम लांजुळकर, संचालक, डिलाइट ऑटोमेशन, पुणे यांनी सत्र घेतले.

पाचव्या दिवशी सहभागींनी औद्योगिक भेट म्हणून फेरो ऑइल्टेक प्रा. लि.मलकापूर या उद्योगाला भेट दिली. त्याच दिवशी "ऑगमेंटेड रियलिटी (एआर) आणि व्हर्चुअल रियलिटी (व्हीआर) ॲप्लिकेशन्स इन मॅन्युफॅक्चरिंग" या विषयावर डॉ. जी. के. आवारी यांनी मार्गदर्शन केले, तसेच श्री. एस. आर. मुंडाले यांनी “ट्रबलशूटिंग इन थ्री-डी प्रिंटिंग” या विषयावर सविस्तर हाताळणी सत्र घेतले.

सहाव्या दिवशी स्ट्रेस मॅनेजमेंट थ्रू मेडिटेशन या विषयावर श्रीमती जया आवारी, स्पिरिच्युअल मेडिटेशन ट्रेनर, नागपूर यांनी मन:शांती आणि एकाग्रतेसाठी ध्यानाचे महत्त्व सांगितले. अखेरच्या दिवशी रिफ्लेक्शन जर्नल, एमसीक्यू फीडबॅक अँड व्हॅलिडिक्टरी सेशन आयोजित करण्यात आले.

या राष्ट्रीय कार्यक्रमात देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील एकूण ५१ सहभागी नोंदणीकृत झाले असून, ३६ सहभागी प्रत्यक्ष उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे नियोजन व समन्वयन प्रा. साकेत पाटील, विभागप्रमुख (यांत्रिकी) आणि सहसमन्वयन प्रा. पांडुरंग भिसे यांनी केले. कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्रा. अमोल तांबे यांनी केली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते, खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे, सदस्य श्री. देवेंद्र पाटील, श्री. पराग पाटील, डॉ. गौरव कोलते यांचे मार्गदर्शन लाभले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)