CSIR-(National Botanical Research Institute, Luckhnow) फ्लोरिकल्चर मिशन अंतर्गत शालेय बागेची स्थापना

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 एम.ई.एस. माध्य. व उच्च माध्य. विद्यालय धामणगाव बढे येथे सी.एस.आय.आर. फ्लोरिकल्चर मिशन अंतर्गत, लखनऊ येथील शास्त्रज्ञ व एम.ई.एस माध्य. विद्यालय धामणगाव बढे विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉक्टर विजय विष्णू वाघ यांनी विविध प्रकारची फुले व झाडे त्यांच्या माध्यमातून विद्यालयासाठी उपलब्ध करून दिली. यामध्ये विविध प्रकारची फुले व झाडे व जंगली झाडे व वनस्पती यांचे महत्त्व डॉ. विजय वाघ यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले, तसेच परिसरात बहुसंख्य शेतकरी वर्ग असल्याकारणाने त्या शेतकऱ्यांना जोड व्यवसाय म्हणून लागवड केलेल्या फुलांच्या माध्यमातून मधमाशी पालन हा जोड व्यवसाय करून, यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, फुल शेती व वन-औषधी यासंबंधी माहिती दिली. यावेळी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री. ए. ए. भालेराव सर, उपप्राचार्य सौ एस एस खडसे मॅडम तसेच विद्यालयाचे व. लिपिक श्री आर एम चव्हाण बाबूजी क. लिपिक श्री आर एम मेमाने प्राध्यापक यु टी दैवे सर प्राध्यापिका कु. डी बी लामखेडे मॅडम   प्राध्यापक एस डब्ल्यू ठाकरे सर प्राध्यापक पी एस शहाणे सर तसेच  श्री एस आर चव्हाण सर  सौ एम एस कोल्हे मॅडम सौ एस बी वाघ मॅडम आणि कुमारी एम ई सवडे मॅडम आणि  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)