कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत इकरा शिक्षण संस्थेच्या एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दिनांक ३१ डिसेंबर २०२५ ते ०६ जानेवारी २०२६ दरम्यान जिल्हा परिषद कन्या शाळा क्रमांक ०१ नशिराबाद येथे करण्यात आले.या शिबिराचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार हे होते.शिबिराचे उद्घाटन भारताचे स्वातंत्र्य सेनानी श्री लालसिंग पवार यांचे पुत्र श्री.रतनलालसिंग पवार यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नशिराबाद येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. योगेश पाटील , केंद्र प्रमुख अफ्शा अंजुम, समन्वय शेख मसुद, सैय्यद सरकत अली, आशिफ अब्दुल गणी, हे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.चांद खान, उप प्राचार्य डॉ.वकार शेख , डॉ.युसुफ पटेल, डॉ. आमिन काझी , डॉ. मुस्तकिम बागवान,प्रा.उमर पठाण हे आर्वजून उपस्थित होते. शिबीराच्या सात दिवसाचे ध्येय , उद्दिष्टे आणि रूपरेषा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.तनवीर खान यांनी विशद केले. या कार्यक्रमात सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.शेख हाफिज , सदस्य डॉ.शेख इरफान, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. कहकशा अंजुम यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मुब्बशिर पटेल यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. शेख इरफान यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आदींची उपस्थिती होती.

