इकरा उर्दू हायस्कूल, बोरनार येथे वार्षिक पारितोषिक वितरण व दहावीचा निरोप समारंभ “उच्च शिक्षण हेच यशाची खरी हमी” – डॉ. अब्दुल करीम सालार

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


बोरनार (वार्ताहर):

इकरा एज्युकेशन सोसायटी संचालित अब्दुल मजीद सालार इकरा उर्दू हायस्कूल, बोरनार येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व इयत्ता दहावीचा निरोप समारंभ अत्यंत शिस्तबद्ध, उत्साही व गौरवपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता सातवीचा विद्यार्थी जजलान फारूक शेख यांच्या सुमधुर कुरआन पठणाने झाली. या भव्य समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अब्दुल करीम सालार हे होते. इकरा बुशरा अँड ग्रुप यांनी इकरा तराणा सादर केला. फिरोज खान पठान यांनी अध्यक्षीय प्रस्तावना तर मजहर खान बिस्मिल्ला खान यांनी अध्यक्षीय अनुमोदन सादर केले.

कार्यक्रमाची उद्दिष्टे व प्रास्ताविक भाषण शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आरिफ मोहम्मद खान यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह शैक्षणिक शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख रोशन जाफर यांनी प्रभावीपणे पार पाडले.

इयत्ता चौथी ते सातवीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिकांची घोषणा शेख अमीर हमीद यांनी केली, तर इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थ्यांच्या पारितोषिकांची घोषणा फिरोज खान पठान यांनी केली. मार्च २०२५ च्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पारितोषिकांची घोषणा जव्वाद अंजुम अजहरोद्दीन शेख यांनी केली. यावेळी माजी विद्यार्थ्यांना “स्टार्स ऑफ इकरा अवॉर्ड” देऊन गौरविण्यात आले. दानिया अब्दुल रहीम देशमुख हिला “बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास इकरा एज्युकेशन सोसायटीचे मान्यवर सदस्य अमीन बादलीवाला,  मजीद जकेरिया , एस. एम. जफर, अब्दुल रऊफ, अब्दुल रशीद शेख, गुलाम नबी बागवान, अजीज सालार, इरफान सालार, तारिक अन्वर, रमीज बादलीवाला, इब्राहिम खान, फारूक पटेल तसेच इतर मान्यवर अतिथी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बोरनार येथील विद्यार्थ्यांना क्रीडा, दीनियात, चित्रकला व इतर उपक्रमांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पारितोषिके देण्यात आली. या पारितोषिकांची घोषणा आबिद फकीर मोहम्मद पिंजारी यांनी केली.

निरोप समारंभात नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोपावेळी भावनिक क्षण अनुभवास आले व अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. अब्दुल करीम सालार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, उच्च शिक्षण हेच यशाची खरी हमी आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम, शिस्त व नैतिक मूल्ये आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवावीत.

हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवर्गासह आकिब सर (लिपिक), मुश्ताक भाई, युसुफ भाई यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचा समारोप मोहम्मद सादिक मुस्तफा बागवान यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)