रसायनशास्त्र विषयातून करिअरच्या संधींवर औद्योगिक संवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


जळगाव : इकरा एच. जे. थीम आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, जळगाव येथील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक ५ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजता “रसायनशास्त्र विषयातून करिअरच्या संधी” या विषयावर औद्योगिक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी विद्यार्थी श्री. सैफ अली उपस्थित होते. ते सध्या सुहान केमिकल्स, एमआयडीसी, जळगाव येथे सीनियर बॅच एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी रासायनिक उद्योग क्षेत्रातील आपले अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर करत करिअर घडविण्यासाठी आवश्यक कौशल्ये, ज्ञान आणि गुणवत्ता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच उद्योगातील कामकाजाचे स्वरूप, रसायनशास्त्र पदवीधरांसाठी उपलब्ध करिअरच्या संधी, तसेच प्रात्यक्षिक ज्ञान, इंटर्नशिप आणि औद्योगिक प्रशिक्षणाचे महत्त्व यावर त्यांनी विशेष भर दिला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मुस्तकीम बागवान यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी विभागप्रमुख डॉ. साजिद मलिक, डॉ. अख्तर शाह आणि मिस झैनब पटेल उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांशी संवाद सत्राने झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनी रासायनिक उद्योग क्षेत्रातील करिअर संधींबाबत विविध प्रश्न विचारले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)