शेतातील ईले.तारांमध्ये शार्टसर्किट होवून साडेतीन एकरातील मका व ठिबक सिंचन संच,पाईप जळून खाक

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 




दोघा शेतकऱ्यांचे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान; शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची शिवसेना (उबाठा) ची म.रा.वि.वि कंपनी कडे मागणी 

मलकापूर:-  तालुक्यातील ग्राम देवधाबा येथील शेतातील विद्युततारांमध्ये दि.16 एप्रिल 26 रोजी दुपारी 3 वाजे दरम्यान शॉर्टसर्किट झाल्याने साडेतीन एकर शेतातील 140 क्विंटल मका, स्प्रिंकलर,ठिबक,पाईप जळाल्याने तब्बल साडेपाच लाख रुपयांचे दोघा शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्याने त्यांना म.रा.वि.वि कंपनीने तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहर प्रमुख हरिदास गणबास यांनी एका निवेदनाद्वारे म.रा.वि.वि कंपनी अभियंता आर.जी. तायडे यांचे कडे केली आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, ग्राम देवधाबा येथील गट नंबर 42 मंजुळाबाई देविदास गोरले यांचे शेतातील दोन एकर मका, ठिबक सिंचन सट, पाईप असा एकूण अडीच लाख रुपयाचे साहित्य जळून नुकसान झाले आहे, तर उमाकांत देविदास गोरले  गट नंबर 51 यांच्या दीड एकर शेतातील मका, स्प्रिंकलर, ठिबक सिंचन, पाईप आदी जळून तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.दोघा शेतकऱ्यांचे अंदाजे साडेपाच लाखापर्यंतचे नुकसान असून शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले असल्याने म.रा.वि् वि कंपनीने त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहर प्रमुख हरिदास गणबास,उमाकांत देविदास गोरले, केशव देविदास गोरले, देविदास सुखदेव गोरले, परमेश्वर प्रभाकर बोरसे, दिपक श्रीराम निळे यांनी केली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)