मलकापुर:- तालुक्यातील कुंड बु!! शिवारातील लगंडी डीपीवरील विद्युत तारा अज्ञात चोरट्यांनी गेल्या तीन महिन्यांपूर्वी लंपास केल्या असून या डि.पी वरील शेतकऱ्यांनी म.रा.वि.वि कंपनी कार्यालयात चकरा मारुन अधिकारी दाद देत नसल्याने याबाबतची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना सांगितल्याने शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी कंपनी कार्यालय गाठून तिन दिवसांत तारा न ओढल्यास म.रा.वि.वि कंपनी कार्यालयातच लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा इशारा दिला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील कुंड बु!! शिवारातील लंगडी डीपी वरील तारा अज्ञात चोरट्यांनी गेल्या तीन महिन्यापूर्वी चोरून नेल्या, विहिरीत पाणी असूनही विद्युत पुरवठा नसल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहे, तीन दिवसात संबंधित लंगड्या डीपीवरील विद्युत तारा न बसविल्यास कंपनी कार्यालयातच आमरण उपोषणाचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी अभियंता खान यांना दिला आहे, यावेळी शिवसेना शहर प्रमुख हरीदास गणबास, किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, अल्पसंख्याक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसीम सै.रहीम,वाहतूकसेना शहर प्रमुख इम्रान लकी,शेख करामत, सतीश पाटील, रामा भोलनकर,वामन चिमकर, शेख महेमूद, निवृत्ती चिमकर, पद्मा पाटील, सलीम ठेकेदार, जावेद भाई, मनू साहेब,हरी पाटील, शेख तौसीफ सह आदीं शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

