पिक विमा मागणीसाठी शेतकऱ्यांसह शिवसेना (उबाठा)चा उपविभागीय अधिकारी यांना आमरण उपोषणाचा इशारा

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
मलकापुर- नांदुरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला असून पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा न दिल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. गतसप्ताहात शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी आपणास निवेदन दिले विमा कंपनीने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शिवसेना पदाधिकारी व शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीच्या कार्यालयाला ताला ठोकला तरीही निगरगट्ट विमा कंपनीला जाग नसल्याने लोकशाही मार्गाने दि.03 डिसेंबर 26 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केले आहे की,  पिक विमा मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी रास्त  असताना विमा कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे शासनाने दुष्काळाची आर्थिक मदत जाहीर करून सुद्धा दुष्काळाची मदत दिली नाही हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी बचत गटाचे कर्ज घेतले आहे व अनेक शेतकऱ्यांनी बँकेतून मुदती कर्ज घेतलेले आहे तरी बचत गट व मुदती कर्जामुळे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली परंतु बँका त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. बँकांना निर्देश देऊन त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक कर्ज देण्यात यावे. गेल्या सहा महिन्यापासून विवरा-रणगांव अपूर्ण रस्ता व मधुकर हरी पाटील यांच्या वाड्यापासून ओंकार चोपडे यांच्या घरापर्यंत जिल्हा परिषद बांधकाम आणि विभागाने मंजूर केलेल्या रस्ता व विवरा ते हायवे नंबर 53  पर्यंत नाली खोलीकरणाचे मंजूर काम ते काम विवरा गावाचे शेजारी अपूर्ण सोडून दिलेले आहे. ही सर्वे कामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी देऊन सुद्धा अद्याप पर्यंत ती काम पूर्ण झालेली नाही. वरील सर्व मागण्या ह्या आठ दिवसात पूर्ण करण्यात याव्या अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर 3 डिसेंबर 26 पासून आमरण उपोषण करण्यात येईल व होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी आपल्या कार्याची राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर वसंतराव भोजने शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख, गजानन ठोसर शिवसेना उपजिल्हाप्रमुख,राजेशसिंह राजपूत विधानसभा संघटक, महादेव वनारे माजी न.प उपाध्यक्ष,पांडुरंग चिम माजी नगरसेवक,शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, उपशहर प्रमुख शकील जमादार, वाहतूक सेना शहर प्रमुख इम्रान लकी, अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै. वसीम, चाॅद चव्हाण विभाग प्रमुख, अर्जून कुयटे विभाग प्रमुख, दीपक कोथळकर, अजय सोनोने,हसन गौरी, मो. इमरान घातक, गोपाल धाडे, इमाम भाई, रफीकभाई पजायवाले सह शेतकरी व शिवसेना पदाधिकार्यांची उपस्थिती होती.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)