मलकापूर:- तालुक्यातील वडोदा (पान्हेरा) येथील शंभर ते दीडशे शेतकऱ्यांचा वडिलोपार्जित शेत रस्ता रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुंदीकरणाच्या नावाखाली तार कंपाऊंड करुन बंद केला असल्याने शेतकऱ्यांना शेतात वहिवाटीसाठी जाण्यास रस्ताच नसल्याने शिवसेना(उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, तहसीलदार समाधान सोनवणे यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी तात्काळ रस्ता मोकळा करून देण्याची मागणी आज दि.12 नोव्हेंबर 26 रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यातील वडोदा, विटाळी, वाघुड या गावातील शेतकऱ्यांची 200 ते 250 वर्षापासून वडिलोपार्जित शेती आहे सदर रस्ता वहिवाटीचा आहे. 116 वर्षांपूर्वी रेल्वे आली त्या बाजूने आजपर्यंत अद्यापही आमची शेतीची वहिवाट सुरूच आहे,आज रोजी रेल्वे रुंदीकरणाचे नावाखाली तारेचे कंपाऊंड केले असून आमचा वहिवाटीचा रस्ता बंद झाला असल्याने सुमारे 400 एकर शेतीत वहिवाटीसाठी रस्ता राहिला नाही. सद्यस्थितीत दुष्काळजन्य परिस्थिती असून कोरडवाहू पिके लावण्यासाठी शेतात बैलगाडी,ट्रॅक्टर जाण्यास रस्ताच नसल्याने आम्हास तात्काळ शेत रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर गजानन डोंबाळे, सुरेश गोंड, परवीन रफिक खान, नारायण कोकाटे, पुंडलिक मालठाणे,गोपाळ दळवी, वसंता तारापूरे, ज्ञानेश्वर बेलोकार, सईद खान रशीद खान, सुखदेव डोबाळे, प्रकाश क्षीरसागर, रामेश्वर गोंड, श्रीकृष्ण सुशीर, युनूस बेग महेबूब बेग,शे. करामत शेख मोहम्मद, भगवान तायडे, शेख करीम शेख मोहम्मद, अरुण तायडे, हरी वरखेडे, संतोष इंगळे, मोहन हिवरखेडे, बाळू गवते, विजय शिमरे, देवकाबाई, दाऊद खाॅ चाॅद खाॅ, विष्णू हिवरखेडे, शेख कलीम शेख कदीर, नंदकिशोर गवते, कोकिळा शिंदे, रफीकभाई पजायेवाले सह आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
