फोर व्हिलर - दुचाकी मध्ये अपघात : दोन जखमी
समाज सेवक झाकीर कुरेशी यांच्या तत्परतेने वाचले दोघांचे प्राण
बुलडाणा
दुचाकी - फोर व्हिलर मध्ये झालेल्या अमोरा समोर धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री सुमारे 11 वाजे दरम्यान खडकी फाट्यावर घडली.
सदर घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की, मोताळा येथून जाकीर कुरेशी समाज सेवक हे आपले खाजगी काम आटोपून बुलडाणा येथे परत येथ असताना त्यांना खडकी फाट्यावर अपघात झाल्याचे आढळून आल्याने त्यांनी मागे पुढे काही न बगता जखमी झालेल्या अवस्थेत उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले.
भारती केलेल्या दोन्ही जखमी रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. असे भारती केलेल्या दोन्ही रुग्णांना वाटले. त्यांनी वेळेवर मिळालेल्या मदतीच्या कृत्याता व्यक्त केली. त्या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यामधील एक रुग्ण हे सावळे पेट्रोल पंपावर काम करणारा कर्मचारी दिग्विजय वाघ वय 25 वर्ष हे आहे. तसेच यांच्या मदतीला शेख जहीर उर्फ बाबा, वसीम मेमन यांनी सहकार्य केले .
