मा. जिल्हा शल्य चिकीत्सक जिल्हा समान्य रुग्णालय, बुलडाणा अर्जदार : ऍड.इमरान रशिद खान (शहर अध्यक्ष) एम.आय.एम. मलकापुर,जिल्हा बुलडाणा रा. राज मोहल्ला पारपेठ मलकापूर ता. मलकापूर जि. बुलडाणा विषय : मोबा नं. ९७६२७४२५५४ उपजिल्हा सामान्य रुग्णालया मलकापूर येथील अधिकारी व कर्मचारी वेळेवर कर्तव्यावर हजर न राहता, तसेच रुग्णांना विविध सेवा मिळत नसल्यामुळे होणारी हेळसांड त्वरीत थाबविणे बाबत. महोदय, उपरोक्त विषयाला अनुसरुन आपणास या तक्रार अर्जाव्दारे कळवितो की, उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे मोठया प्रमाणात इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले असून या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व स्टॉफ नर्स, व इतर कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, परंतु सदर कर्मचारी हे वेळेवर आपल्या कर्तव्यावर हजर राहत नसून आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता दैनंदिन रुग्ण तपासणे त्यांना वेळेवर उपचार मिळणे गरजेचे असतांना सदर कर्मचारी हे वेळेवर हजर राहत नाही व जे हजर कर्मचारी आहेत त्यांचेकडून उडवा उडवीचे उत्तरे देण्यात येतात,
तर महिलांसाठी प्रसुती वा इतर आरोग्याची सुविधा उपलब्ध असल्या नंतरही बऱ्याच महिलांना रेफर करण्यात येते तसेच रक्त लघवी तपासणी, एक्सरे, व इतर टेकनिकल सोयी सुविधा उपलब्ध असतांना देखील गोर गरीब रुग्णांना नाहक खाजगी रुग्णालयात पाठविण्यात येत आहे, तर काही रुग्णाला इंजेक्शन वा इतर औषधांची आवश्यकता असतांना फक्त दोन चार गोळया देवून परत पाठविण्यात येत आहे. त्यामुळे गोर गरीब रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्या करीता वरीष्ठ स्तरावरुन या दवाखान्यामध्ये अकस्मात टीम पाठवून या होणाऱ्या गैर कारभाराची त्वरीत चौकशी करुन जे अधिकारी व कर्मचारी हे आपल्या कर्तव्यात कसूर करीत आहे त्यांचेवर योग्य ती कारवाई करावी हि विनंती. जर संबधीत रुग्णालयातील कारभारा बाबत सुधारणा झाली नाही तर नाईलास्तव आम्हाला रुग्णांच्या न्याय हक्का करीता लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल याची दक्षता घ्यावी. करीता हे निवेदन सादर स्थळ :- मलकापूर दिनांक :- १४/१०/२०२२ ऍड.इमरान रशीद खानशहर अध्यक्ष AIMIM मलकापुर
