दुचाकीवर अवैध देशी दारू चे बॉक्स घेऊन जाणाऱ्या एका विरुद्ध पोलिसांनी दारूबंदी कायदा नुसार गुन्हा नोंदविला. सदर कारवाईत २० हजार रुपये किमतीच्या दारूसह ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार सहायक फौजदार मोहन शंकरराव गीते यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार छापा मारला असता आरोपी शरद भुजंगराव दांडगे वय ३५, राहणार गारखेड हा आपल्या दुचाकी ने अवैध देशी दारू वाहतूक करताना मिळून आला. त्याच्या राज्यातून पोलिसांनी २८८ नग अवैध दारूच्या शिष्या किंमत २० हजार १६० रुपये व दुचाकी किंमत ५० हजार असा एकूण ७० हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर प्रकरणात आरोपी विरुद्ध पोलिसांनी दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे.

