खेळासोबतच खेळाडुंनी अभ्यासाकडे सुध्दा लक्ष दिल्यास भविष्यात नक्कीच फायदा - तहसीलदार सुरडकर

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

    


मलकापूर

    मलकापूर खेळाडुंनी ५ टक्के आरक्षण मिळविण्याकरीता पहिली पायरी म्हणून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा ह्या असून या खेळासोबतच खेळाडुंनी अभ्यासाकडे सुध्दा लक्ष दिल्यास भविष्यात त्यांना याचा फायदा होवू शकतो. याकरीता खेळाडुंनी दोन्ही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन तहसीलदार राजेश सुरडकर यांनी केले.

    बुलडाणा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया अंतर्गत मलकापूर तालुका स्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन मलकापूर येथील तालुका क्रीडा संकुलमध्ये १७ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर पर्यंत करण्यात आले आहे. त्या विविध क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज १७ ऑक्टोबर रोजी न.प. प्रशासक तथा तहसीलदार राजेश सुरडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाराकाँ तालुकाध्यक्ष बंडूभाऊ चौधरी, जेष्ठ पत्रकार हरीभाऊ गोसावी, समाधान इंगळे सर, राजू जवरे, छत्रपती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके सर, तालुका संयोजक दिनेश राठोड सर, क्रीडा मार्गदर्शक स्वप्नील साळुंके, विनायक सर, मोहसीन सर आदींची उपस्थिती होती. या आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये एक महिन्यात फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बुध्दीबळ, कबड्डी, कुस्ती, योगासन, बुध्दीबळ, कबड्डी, कुस्ती, योगासन, अॅथलेटीक्स अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.


फुटबॉल स्पर्धेत चित्तथरारक १७ वर्षाखालील सामन्यात वायपीएस संघाने एमएसएम संघावर ११ विरूध्द १० गोलने मात केली. १४ वर्षाखालील तर सामन्यात वायपीएस संघाने एसओएस संघावर २ विरूध्द ० ने मात करत तालुकास्तर स्पर्धेचे अजिंक्य पद पटकविले. सदर स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहेत.कार्यक्रमाचे संचलन व आभार चंद्रकांत साळुंके सर यांनी आज पहिल्या दिवशी झालेल्या केले. 



एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)