मोताळा तालुक्यात धामणगाव बढे ग्राम, पंचायत तलुक्यात सर्वात मोठी आहे ग्रा,प, मध्ये 17 सदस्य असून, गेल्या दीड वर्षापूर्वी सरपंचपदावर जिनत अलीम कुरेशी ह्या विराजमान झालया.जिनत अलीम कुरेशी यांना सरपंचपदावर दीड वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांना विकासकामांबाबत काही प्रश्न विचारले असता ते म्हणाल्या की, दीड वर्षात सुमारे 1 कोटी 17 लाख रुपयांची विकासकामे अतिशय चांगल्या पद्धतीने केली आहेत. धामणगाव बढे गावात एकूण ६ वार्ड आहेत. जिनत अलीम कुरेशी यांची सरपंचपदी नियुक्ती झाल्यानंतर सर्वच प्रभागात विकासकामे झाली आहेत. ज्यामध्ये गावातील सर्व वाड्यांमध्ये 40 लाख रुपये खर्चून काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला, प्रभाग क्रमांक 3 मध्ये पाच लाख रुपये खर्चून पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले, संपूर्ण गावातील पाण्याचा निचरा होण्याच्या समस्येतून मुक्तता झाली. लोकांची ही अडचण लक्षात घेऊन 26 लाख रुपये खर्चून संपूर्ण गावात नाल्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. त्याचबरोबर स्मशानभूमीसाठी 15 लाख रुपये खर्चून स्मशानभूमीचे काम करण्यात आले. धणगर समाजासाठी 10 लाखांचे सभागृह, तसेच शाळांच्या सुशोभीकरणासाठी 6 लाख रुपये खर्चून गावातील अनेक मुख्य चौक - चौकांवर 15 लाख रुपये खर्च करुण हायमस् पोल लावण्यात आले आहे त्याचबरोबर गावातील लोकसंख्येनुसार नागरिकांना वेळेवर पाणी मिळण्याची कोणतीही अडचण येऊ नये, या दृष्टीने सरपंचपती अलीम कुरेशी यांनी पत्रव्यवहार करून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून दिले. जल जीवन मिशन योजनेंतर्गत 2 कोटी 74 लाख रुपये खर्चून संपूर्ण गावात नवीन पाइपलाइन तसेस् एक् नविन पाण्याची टाकीचा काम सुरू करण्यात आला आहे. गावाच्या विकास कामासाठी आमदार संजय गायकवाड व खासदार प्रतापराव जाधव यांचे सहकार्य व मार्गदर्शन नेहमीच मिळत असल्याचे सरपंच अलीम कुरेशी यांनी सांगितले... गावाच्या विकासासाठी आपण सर्व गाव, ग्रा, प्, सरपंच, उपसरपंच, आणि गाव, ग्रा,प, सदस्य सदैव तत्पर आहोत. गेल्या दीड वर्षात ग्रामस्थांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, त्यात दोन ठिकाणी आरओ प्लांट, स्मशानभूमीतील भूमिगत गटार, बसस्थानक संकुलाचा 3 कोटी 50 लाख रुपये खर्चून बांधलेला काँक्रीट रस्ता, या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी वारंवार पत्रव्यवहार करून ही सर्व कामे अंतिम टप्प्यात आणण्याचे काम आम्ही केले आहे. ग्रा, पा, ची अनेक कामे प्रस्तावित आहेत, ती येत्या काही दिवसात लवकरच पूर्ण होतील सरपंचपती अलीम कुरेश,
