*चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात एंट्री : भुसावळ ठरतेय गुटख्याचे 'जंक्शन'*
*भुसावळ*: शहरातील सर्व भागात तसेच रेल्वे व बसस्थानकातही खुलेआम पद्धतीने गुटख्याची विक्री होत आहे. शासनाने राज्यात गुटखा विक्रीवर बंदी घातली असली तरी शहरात कुठे लपूनछपून तर कुठे बिनधास्त गुटखा विकला जात आहे. याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
भुसावळ शहर हे मध्य प्रदेश, गुजरात राज्यांच्या सिमेलगत वसले आहे. त्यामुळे अनेक चोरवाटांनी बंदी घातलेला गुटखा महाराष्ट्रात आणला जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सर्वच यंत्रणा याकडे केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.
बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसरात स्टॉल लावून गुटख्याची विक्री करण्यात येत आहे. शहरातील अनेक पानटपऱ्यांवर गुटखा विकणाऱ्यांवर कारवाई करणारेच गुटखा खाताना दिसतात.
भुसावळ हे रेल्वेचे जंक्शन आहेच;
बसस्थानक परिसरात गुटखा विक्री होताना तर, दुसया छायाचित्रात रेल्वेत गुटख्याची विक्री. (छाया : शाम गोविंदा)
प्रवासी गाड्यांमध्ये गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सोमवारपासून मी ड्यूटी जॉइन करणार
आहे.
-राधाकिशन मीना, आरपीएफ इन्स्पेक्टर.
माझ्याकडे भुसावळ विभागाचा प्रभारी चार्ज आहे. गुटखा विक्रीवर नक्कीच कारवाई होईल. त्याबाबत मी त्वरित संबंधितांना सूचनाही देतो. -संदीप गावित, प्रभारी डीवायएसपी.
परंतु, आता ते गुटख्याचेही जंक्शन फेरीवाल्यांप्रमाणे गुटखा विक्रेतेही अधिकारी व जवानांनी याला आळा होतेय की काय, असा प्रश्न निर्माण होत बिनधास्त शिरत आपला माल घालण्याची मागणी प्रवासी करीत आहे. कारण, रेल्वेत इतर खपवत आहेत. रेल्वे सुरक्षा बलाच्या आहेत.
