घरकुल_योजना*आज ऑल इंडिया मजलिस ए एतेहादुल मुस्लिमीन की तर्फसे मुख्याधिकारी साहेब, मलकापुर को निवेदन दिया गया जिसमे ये मांग की गई, *प्रधान_मंत्री_आवास_योजना* (घरकुल योजना) के हप्त्तो (राज्य के 1 लाख रु. और केन्द्र

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
* के डेढ़ लाख रु.) को त्वरीत वितरण किया जाए वरना AIMIM मलकापुर #लाभार्थ्यों के साथ नगर पालिका के बाहर *आमरण_उपोषण दि.15/12/2022* से शुरू करेंगी...
 
तफसील,
 उपरोक्त विषयाला अनुसरुन आम्ही आपणास निवेदन सादर करतो की, मलकापूर शहरातील नागरिक यांना शासनाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकूल बांधकामा करीता अनुदान मंजुर करण्यात आले असून सदर लाभार्थी यांनी न.प. मलकापूर यांचे कडे प्रस्ताव व विविध कागदपत्रांची पुर्तता केल्या नंतर घरकूल बांधकाम करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदर लाभार्थी हे गोर गरीब, असून यांनी उधार उसनवार करुन आपले घरांचे बांधकामाकरीता साहित्य खरेदी केले असून घरांचे काम सुरु केले आहे. सदर घरकुलांचे काम आज रोजी अर्धवट अवस्थेत पडलेले आहे, कारण न.प. च्या वतीने अद्याप पर्यंत त्यांना अनुदानाच्या कुठल्याही हप्याचे वितरण न झाल्यामुळे घर बांधकामा करीता उधार उसनवार केलेल्या रक्कमेची परत फेड न केल्यामुळे त्यांना विटा रेती सिमेंट आदी साहित्य खरेदी करीता तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर एकीकडे घरांचे अर्धवट बांधकाम झाले असल्यामुळे त्यांचा संसार हा उघडयावर आला असून ऐन कडाक्याच्या थंडीत गोर गरीब लोकांचे परिवार हे रत्यावर आल्याचे दिसून येत आहे. या मध्ये परिवारातील शालेय विद्यार्थी, वृध्द नागरिक यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
सदर लाभार्थी यांनी घरकूल अनुदाना करीता कागदपत्रांची पुर्तता केल्या नंतरही त्यांना न.प. कडून हप्त्याची रक्कम मिळत नसून आपला मोल मजुरी चा व्यवसाय व इतर काम धंदे सोडुन ते दैंनदिन न.प. कडे चकरा मारत असून त्यांना खाली हाताने परत फिरावे लागत आहे.

 महोदय, प्रधानमंत्री आवास योजने करीता शासनाचा निधी हा आपल्या न.प. कडे पडून असल्या नंतरही या लाभार्थ्यांना अनुदान हप्यांचे वाटप होत नसल्यामुळे अनेक परिवारांवर आज रोजी उपासमारीची वेळ आली असून अनेकांना मानसिक त्रासाला सामारे जावे लागत आहे. त्यामुळे आपण या बाबीकडे त्वरीत लक्ष देवून घरकूला करीता मंजुर असलेल्या निधीचे हप्ते त्वरीत या लाभार्थ्यांना देण्या बाबत संबधींताना आदेश द्यावेत अन्यथा आम्हाला या लाभार्थ्याना न्याय मिळवून देण्या करीता या लाभार्थ्यांच्या परिवारासह आपल्या नगर परिषद कार्यालया समोर दि.१५/१२/२०२२ पासुन आमरण उपोषण करावे लागेल यांची नोंद घ्यावी. असा निवेदन न.प. ला दिला..

#उपस्थित,
#ऍड_इमरान_रशीद_खान
(AIMIM शहर अध्यक्ष,मलकापुर)
#डल्ला_पहेलवान
(AIMIM शहर महासाचिव, मलकापुर)
#इमरान_मौलाना
(AIMIM शहर सहसचिव,मलकापुर)
#अकरम_खान
(AIMIM अपंग सेल शहर अध्यक्ष,मलकापुर)
#ज़िशान_मिर्ज़ा
(सोशल एक्टविस्ट, मलकापुर)
#शेख_मुबाशिर (बादशा भाई)
(AIMIM युवा नेते,मलकापुर)
#आरिफ_चाचा
(AIMIM शहर सदस्य,मलकापुर)
#सै_मुदस्सिर
(AIMIM शहर सदस्य, मलकापुर) और #सै_हैदर_चाचा,
#शब्बीर_शेख,
#भाई_साबिर_खान मौजूद थे..

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)