विभागातर्फे दि. 26 नोव्हेंबर शनिवार रोजी ठिक १०.३० वाजता वरिष्ठ एच. जे. थीम कला व विज्ञान महविद्यालय, मेहरूनच्या सभागृहात कबचौउमवि उर्दू अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. साजिद अली कादरी द्वारा लिखित उर्दू काव्य परंपरेतील कवि कुली कुतुबशाह यांच्या कविता संग्रहा वर आधारित शब्दकोश व ‘एअने शेरी अदब’ ग्रंथाचे विमोचन जि.प. धुळेचे अध्यक्ष डॉ. तुषार भाऊ रंधे व डॉ.मेहताब आलम (भोपाल) यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार भूषविणार आहेत.
कार्यक्रमात डॉ. हमीदउल्ला खान परभणी, डॉ. सलिम मोईउद्दीन परभणी, डॉ. शरफउद्दीन साहिल नागपुर, प्राचार्य डॉ. अकीला गौस अंबेजोगाई, डॉ. एम.एम शकील बुरहानपुर, डॉ. कुरेशी अतिक अहेमद बदनापुर, डॉ. अंसारी मसूद अख्तर जालना, डॉ. इकबाल शाह, एजाज मलिक प्रमुख अतिथी म्हनून उपस्थित राहणार आहेत. तरी उर्दू प्रेमी साहित्यकांनी, नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार यांनी आव्हान केले आहे.
