क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाचे वेळी मा.सरपंच पती संतोष जी दिघे माअब्दुल बासित जमादार मा.ग्रामविकास अधिकारी श्री जी आर ठाकरे साहेब ग्रामपंचायत लिपिक सुनील जुमडे सर ग्रामपंचायत सदस्य शेख असद ,ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामपंचायत माजी सदस्य शालिग्राम जुमडे ,प्रल्हाद इंगळे, ग्रा.प. सदस्य रविभाऊ सातव ,शेख युसुफ शेख हारून ,साप्ताहिक लेखनि शस्त्र चे उपसंपादक श्री हरिभाऊ जुमडे व इतर मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम पार पडण्या अगोदर ग्रामपंचायत मध्ये मी साप्ताहिक लेखनिशस्त्र संपादक शेख सरदार शेख कदीर मा. संतोष जी दिघे यांना जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेला आठ शिक्षकांची कमतरता असल्याची माहिती दिली आणि 17 शिक्षकांऐवजी फक्त नऊ शिक्षक कार्यरत असून एका शिक्षकाकडे दोन दोन वर्ग अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे कित्येक वर्षापासून शैक्षणिक खूप नुकसान होत आहे त्यामुळे मी माझ्या वृत्तपत्राला सदर विषयाबाबत बातमी सुद्धा लावली होती आणि आज दिनांक 28 11 2022 रोजी सरपंच पती महोदयांना विनंती केली कि ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत फंडामधून प्रति शिक्षक पाच हजार रुपये मानधन देऊन गावातील पदवीधर शिक्षकांना सदर शाळेवर शिकवण्याची संधी देण्यात यावी व ग्रामपंचायत मार्फत कमीत कमी दोन शिक्षक शाळेला पुरविण्यात यावे मी असे सांगितल्यावर संतोषजी दिघे यांनी क्षणाचा विलंब न करता स्वखर्चाने मी एका शिक्षकाचे मानधन स्वतः देणार अशी घोषणा केली त्याच वेळेस मा. ग्रामविकास अधिकारी जीआर ठाकरे साहेब यांनी सुद्धा असे सांगितले की त्यांच्याकडून आणि ग्रामपंचायत लिपिक सुनील नारायण जुमडे यांचे कडून एका शिक्षकाचे मानधन पुरविण्यात येऊन दिनांक एक डिसेंबर 2022 पासून सदर घोषणा अमलात आणली जाईल असे स्वतः सांगितले आपल्या गावासाठी ही गोष्ट फार अभिमानाची असून मी येथील सर्व नागरिकांना विनंती करतो की जोपर्यंत शासनाकडून नवीन भरती होऊन सदर शाळेला शिक्षक लाभत नाही तोपर्यंत ज्याप्रमाणे संतोष जी दिघे सुनील जुमडे आणि ग्रामविकास अधिकारी जीआर ठाकरे यांनी प्रथम पुढाकार घेतला अशाच प्रकारे गावातील समाजसेवा इच्छुक बांधवांनी उर्वरित सहा शिक्षकांची कमतरता भरून निघणे करिता पुढाकार घ्यावा शक्य असल्यास पाच हजार रुपये प्रति महिना प्रतिशिक्षकाला दिल्या जाणार असल्याबाबत कोणीही व्यक्ती एका शिक्षकाचे जबाबदारी घेऊन सदर शाळेचे व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवू शकतो या बाल फुलपाखरांचे भविष्य उज्वल करणे हेतू वडनेरभो. नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्यासाठी तात्काळ ग्रामपंचायत सरपंच संतोष भाऊ दिघे यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा ही नम्र विनंती.
तसेच गावातील पदवीधर शिक्षकांनी तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा
संतोष भाऊ दिघे 9765749547
जीआर ठाकरे साहेब. 9422735918
सुनील जुमडे लिपिक. 9763054647
एस के शेख संपादक. 9421105771
माझ्या विनंतीस मान देऊन सदर कार्यास गती दिल्याबद्दल मी वडनेर भोलजी ग्रामपंचायतचे सर्व मान्यवरांचा खूप आभारी आहे धन्यवाद
आपला स्नेहांकित
एस के शेख साप्ताहिक लेखनि शस्त्र संपादक
वडनेर भोलजी
